गायिका नेहा कक्‍करच्या ‘त्या’ व्हिडीओचा ‘बोलबाला’ ; नेहाच्या ‘दिलखेच’ अदांनी फॅन्स घायाळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये रिमिक्स गाण्यांचा काळ खूपच जुना आहे. परंतु हिट गाण्यांना रिक्रिएट करून लोकांना आपल्या सुरांवर डोलायला लावण्यात आपलीच एक वेगळी मजा असते. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अशा गाण्यांना आपला आवाज देत पुन्हा हिट करण्यात पारंगत आहे. 2019च्या सुरुवातीस आलेल्या सिंबा या सिनेमात अशाच काही गाण्यांना पुन्हा बनवलं गेलं. तेरे मेरे सपने या सिनेमातील डान्स नंबर आँख मारे वो लडका हे गाणं हे नेहा कक्करने गायलं आणि नवीन कलाकारांसोबत ते शुट केलं गेलं. हे गाणं चांगलंच हिट झालं. नेहाने या गाण्यावर काही दिवसांपूर्वी डान्सही व्हिडीओदेखील बनवलं होतं. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

तुम्हाला सांगू इच्छितो की, नेहाने तिच्य इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यातून नेहाने माहिती दिली आहे की, या गाण्याला युट्युबवर 100 मिलियन व्ह्युज झाले आहेत. नेहाने या गाण्यात पोल्का डॉट्स ड्रेस घालून कोरियोग्राफर मेल्विन लुइससोबत धमाकेदार डान्स केला आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, अरशद वारसीच्या सिनेमा तेरे मेरे सपने मधील आँख मारे या गाण्याला कुमार सानू आणि कविता कृष्णमुर्ती यांनी गायलं होतं. सिंबा सिनेमात या गाण्याला मिका सिंग आणि नेहा कक्करने गायलं आहे. या गाण्याच्या शेवटात रोहित शेट्टीच्या सुपरहिट सिनेमांची सीरीज गोलमालधील अ‍ॅक्टर्स अरशद वारसी, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूरदेखील दिसतात.

 

You might also like