‘पटेल यांना कॅबिनेटमध्ये ठेवण्याची इच्छा नव्हती नेहरूंची’, जाणून घ्या कोणत्या प्रकरणाबद्दल परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केलं ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी नारायणी बसु यांनी लिहिलेल्या व्हीपी मेनन यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन केल्यानंतर अनेक ट्विट केले आहेत. एस जयशंकर यांनी ट्विटमध्ये लिहिले की, या पुस्तकातून मला समजले की, 1947 मध्ये नेहरू (भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू) आपल्या कॅबिनेटमध्ये पटेल (सरदार वल्लभभाई पटेल) यांना जागा देण्यास तयार नव्हते. एका अन्य ट्विटमध्ये एस जयशंकर यांनी लिहिले की, नारायणी बसु यांनी लिहिलेल्या व्हीपी मेनन यांच्या आत्मचरित्रात पटेलांचा मेनन यांच्याशी आणि नेहरूंचा मेननयांच्याशी खुप विरोधाभास दिसून आला. मोठ्या कालावधीनंतर एका ऐतिहासिक पुरूशांसोबत न्याय झाला आहे.

एका अन्य ट्विटमध्ये लिहिले आहे की, राजकीय इतिहास लिहिण्यासाठी आपल्याला पूर्ण प्रामाणिकपणा हवा. व्हीपी मेनन यांनी म्हटले होते की, जेव्हा सरदार पटेल यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या आठवणी विसरण्यासाठी व्यापक प्रमाणात कॅम्पेन करण्यात आले. मला हे यामुळे माहित आहे, कारण मी ते पाहिले आहे.

भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष नेहमीच जवाहर लाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्या नात्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सुद्धा नेहमी यावरून वक्तव्य करत असतात.