नेहरू-गांधी-स्टॅलिन सर्व नेते एकाच कॅबिनेटमध्ये; जाणून घ्या पूर्ण प्रकरण…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुक पक्षाला बहुमत मिळाले. एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या मुखमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, त्यांनी कॅबिनेटमध्ये ज्यांचा समावेश केला त्यांची नावे चांगलीच चर्चेत आहेत.

एम. के. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात नेहरू, गांधी यांचा समावेश आहे. के. एन. नेहरू हे द्रमुकचे मुख्य सचिव आहेत. त्यांनी पाचव्यांदा तिरूची पश्चिम विधानसभा लढवली. के. एन. नेहरू यांचे वडील काँग्रेसी होते. त्यांना जवाहरलाल नेहरू आवडत होते. तसेच आर. गांधी हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते पक्षात विशेष जबाबदारी पार पाडत आहेत. या आमदारकडे खादी ग्रामोद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. अशा प्रकारे स्टॅलिन सरकारच्या मंत्रिमंडळात नेहरू आणि गांधी दिसत आहेत.

दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा विजय झाला. आता स्टॅलिन यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेवर आले आहे. स्टॅलिन यांना राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.