शेणावरून शेजार्‍यांशी भांडण झाल्यानंतर त्यानं चक्क गोळी झाडून केली हत्या

उत्तर प्रदेश, ता. २३ : पोलीसनामा ऑनलाइन : गायीच्या चुकीवरून झालेल्या वादातून एका शेजाऱ्याने दुसऱ्यावर गोळी झाडली. केवळ गायीच्या शेणावरून झालेल्या वादात दोन शेजाऱ्यांनी आधी भांडणं केलं नंतर एकाने दुसऱ्याची हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील संकरा गावातील आहे. या गावात गायीच्या शेणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झालं होतं. गायीच्या शेणापासून तयार गवऱ्या मृत व्यक्तीच्या गायीने तुडवल्या. त्यामुळे गवऱ्या तुटल्या. यावरून बिंद नावाची व्यक्ती शेजारी राहणाऱ्या मुन्ना नावाच्या व्यक्तीवर रागावला. बिंदने याच रागात मुन्नावर गोळी झाडली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या भावाचं लग्न होणार होतं. हत्येची माहिती मिळताच गावातील लोक संतापले आणि गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची गंभीरता बघता गाजीपूर एसपी स्वत: पोलिस दल घेऊन तिथे पोहोचले आणि गावकऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. गावात हत्येमुळे निर्माण झालेला तणाव बघता परिसराला छावणीचं रूप आलं होतं. जेणेकरून दुसरी कोणतीही अनुचित घटना घडू नये.

पोलिसांनी माहिती दिली, की संकरा गावातील विशाल बिंदच्या गायीच्या शेणाच्या गवऱ्या मुन्ना बिंदच्या गायीने मोडल्या. यावरून दोघात वाद झाला. त्यानंतर मुन्ना बिंद घरासमोर बसला होता त्यावेळी विशाल बिंद साथीदारासोबत आला आणि त्याने मुन्ना बिंदवर गोळी झाडली. विशाल बिंद तेथून फरार झाला होता. लवकरच त्याला अटक करण्यात आली.