अति उत्साहात येऊन त्यानं शेजारणीचे फोटो सेंड केले मित्रांना, गाव पंचायतीनं युवकांसोबत केला धक्कादायक प्रकार

नोएडाः पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणा-या तरुणीचे फोटो घेऊन मित्राला पाठवल्याबद्दल संतापलेल्या पंचायतीने दोघा तरुणांना चपलांची माळा घालून मारहाण केली. राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडाच्या दादरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या दादरी भागात राहणा-या दोघा तरुणांनी शेजारी राहणा-या तरुणीचे फोटो घेऊन फोटोशॉपच्या मदतीने छेडछाड करीत आपल्या मित्रांना पाठवले. हे प्रकरण मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर कुटुंबियांनी 3 मे रोजी पंचायत बोलावून दोन तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलावले होते. या प्रकरणात पोलिसांना बोलावण्याऐवजी पंचायतीने स्वत:च निर्णय घेतला. तरुणांना चपलेचा हार घालून बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर पंचायतीचा व्हिडिओ तयार करू सोशल मीडियावर शेअर केला. जेंव्हा पोलिसांना या प्रकरणाबाबत माहिती मिळाली, त्यांनी आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये एक शिक्षकाचाही समावेश आहे.