उद्धव ठाकरेंच्या दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदूत्व, ना धर्मनिरपेक्षता : भाजप

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – दस-यानिमित्त दरवर्षीप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM, Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी यंदाही शिवसैनिकांना संबोधित केले. मात्र, यावेळी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर सावरकर सभागृहातून संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर हिंदुत्व, कोरोना लस, बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता भाजपनेही ठाकरेंवर पलटवर केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण (dussehras-shiv-sena-speech) म्हणजे, केवळ गडबड गोंधळलेल्या पक्षप्रमुखाच्या भाषणाचा उत्तम नमुना होता. त्यांच्या भाषणात ना धड हिंदूत्व होतं, ना धड विकास होता, ना धड धर्मनिरपेक्षता (neither-hindutva-nor-secularism) होती. मी त्यांना सांगू इच्छितो, की काळ्या टोपी खाली मेंदू असतोच, पण तो मेंदू सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवणारा नसतो, असा पलटवार भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

भटखळकर म्हणाले, ज्यांनी कसाबला बि-यांनी दिली त्यांच्यासोबत आम्ही नाही. आम्ही याकूब मेननच्या माफीची मागणी करणाऱ्यांसोबत नव्हतो. ज्या शेतकऱ्यांचे राज्यात मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांवर तर उद्धव ठाकरे बोललेच नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणा दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोबरदस्त निशाणा साधला होता.ठाकरे यांनी त्यांना काळी टोपीवाले, म्हणून संबोधित केले होते.

राम कदम यांचाही सेनेवर हल्लाबोल
भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेनेने सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचे आयोजन करून हिंदुत्वाचे धडे दिले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानेही सावरकरांची प्रशंसा का केली नाही, हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत. त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात असे कदम म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात झाला. ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता. शिवाय, कोरोनासह राज्यात विविध मुद्यांवरून सरू असलेल्या राजकी्य घमासानाबाबत ठाकरे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता होती. राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना रनौतवरून निर्माण झालेला वादंग, आदी मुद्द्यांवरही त्यांनी यावेळी भाष्य केले.