ना इंटरनेट बँकिंग, ना Paytm अकाऊंट, तुम्हाला नाही येणार मेसेज अथवा OTP, तरी देखील अकाऊंटमधून ‘कपात’ होईल रक्कम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल बॅंकिंग घोटाळे खूप होत आहे. अशामध्ये ग्राहक अशा फसवणूकीचे शिकार होत असतात. बऱ्याचदा बॅंक ग्राहकांना सतर्कतेचा इशाराही देतात. पण तरी देखील ग्राहक फसवणूकीला बळी पडतात. कधीकधी ग्राहक विश्वासाने आपला बॅंकेचा तपशील एखाद्या व्यक्तीला देतो. पण ते याचा विचार करत नाही की, हा तपशील दिल्याने त्यांची खूप मोठी फसवणूक होऊ शकते.

असेच काहीसे घडले आहे मुंबईतील येस बँकेचा ग्राहक शहाब शेख बाबतीत. शहाब शेख यांना येस बँकेचा फोन आला आणि तुम्हाला पेटीएमच्या माध्यमातून बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून शहाब शेख थक्क झाले. वास्तविक, त्याच्याकडे पेटीएम खाते नव्हते आणि इंटरनेट बँकिंग देखील ते वापरत नव्हते.

आश्चर्य म्हणजे शहाब शेख यांना ओटीपी किंवा कोणत्याही बॅलेन्स संबंधित मेसेज मिळाला नव्हता आणि त्यांच्या खात्यातून 11 जुलै ते 16 जुलै या कालावधीत 11 वेळा पेटीएम खात्यात पैसे पाठविण्यात आले. शहाब यांच्या खात्यातून एकूण 42,368 रुपये पाठविण्यात आले.

शहाबने या वेळी यासंदर्भात बँकेला विचारले, तेव्हा सुरुवातीला ते म्हणाले की, हे पैसे काही दिवसात मिळतील, परंतु नंतर बँकेने सांगितले की, ही आपली चूक आहे कारण त्याने आपली सर्व बँक तपशील कोणालातरी दिली. शहाबने आता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बँकेला याबाबत माहिती देण्यासाठी पत्र लिहिले आहे.

ऑनलाइन फसवणूक कशी टाळायची ?
वास्तविक अशा बर्‍याच घटना समोर येत आहेत. आरबीआय नेहमी वेळोवेळी याबाबत सावधगिरी बाळगण्याचे सांगतात. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग वापरताना मोठी काळजी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यासाठी काय करावे
– कोणालाही कधीही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील देऊ नये.
– सार्वजनिक वाय-फाय किंवा इंटरनेट नेटवर्कद्वारे कधीही बँकिंग व्यवहार करू नका
– बँकिंग खाते नेहमी मोबाइल नंबरसह अपडेट केले जावे आणि डेबिट कार्डचा सीव्हीव्ही, नंबर किंवा पिन सारख्या बँकिंग तपशील मोबाइलमध्ये ठेवू नये.
– आपण पेमेंट अ‍ॅप वापरत असल्यास, सावधगिरी बाळगा. पेमेंट अ‍ॅपला जास्त अधिकार देऊ नका.
– ऑनलाईन व्यवहारासाठी स्वतंत्र खाते ठेवणे चांगले आणि त्यामध्ये चार किंवा पाच हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम ठेवू नये. आपले मुख्य बँक खाते इंटरनेटशी लिंक करु नका.