NEMS School Pune | आजी आजोबांनी निभावली परीक्षकांची भूमिका; एनईएमएस शाळेचा अनोखा उपक्रम

पुणे: NEMS School Pune | आजी आजोबांची लहान मुलांच्या संगोपनात खूप महत्त्वाची भूमिका असते. आज जेव्हा आई वडील दोघे कामासाठी बाहेर पडतात तेव्हा आजी आजोबा नातवंडांना शाळेत सोडणे, घरी घेऊन येणे, त्यांचा अभ्यास घेणे, संध्याकाळी बागेत खेळायला नेणे इ. मध्ये खूप उत्साहाने सहभाग घेतात. तसेच मुलांवर संस्कार करण्यामध्येही त्यांच्या आजी आजोबांचा मोलाचा वाटा असतो. त्यांचे हे मोलाचे योगदान लक्षात घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एन्.ई.एम्.एस्. पूर्व प्राथमिक शाळा, शनिवार पेठ येथे गोष्ट सांगणे स्पर्धा आणि श्लोक पाठांतर स्पर्धेचे परीक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना आमंत्रित करण्यात आले होते. (NEMS School Pune)

गणेशोत्सव काळात घेतलेल्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र, मनाचे श्लोक, गणपतीचे श्लोक इ. म्हणून दाखविले तसेच गणपतीच्या विविध गोष्टी सांगितल्या. स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. (NEMS School Pune)

आपल्या आजी आजोबांना शाळेत बोलावल्याने विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला.
स्पर्धेच्या शेवटी सर्व परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांनी भेटकार्ड देऊन त्यांचे आभार मानले.
आजी आजोबांनी हा अनुभव खूप छान असून पुन्हा शाळेत येण्याची इच्छा व्यक्त केली.
शाळा समिती अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.

Web Title :- NEMS School Pune | Grandparents played the role of examiners; A unique initiative of NEMS School

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?

Maharashtra Municipal Election | शिंदे गटासोबत युती करणार?, मनसेचं मोठं विधान

Pune Crime | हडपसरमध्ये 2 मैत्रिणींची आत्महत्या; एकीने घेतला गळफास तर दुसरीने इमारतीवरुन मारली उडली