नेपाळ पोलिसांकडून 120 चीनी नागरिकांना अटक, 500 हून अधिक ‘लॅपटॉप’ जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोलिसांनी १२० चीनी नागरिकांना अटक केली आहे. या लोकांकडून पोलिसांनी पाचशेहून अधिक लॅपटॉप जप्त केले आहेत.

काठमांडूचे पोलीस प्रमुख म्हणाले की काही संशयित लोकांची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी छापा टाकून संशयितांना एकत्र करण्यात आले.

एका वृत्तानुसार नेपाळच्या पोलीस प्रमुखांनी सांगितले की हे पहिल्यांदा घडत आहे की इतक्या मोठ्या संख्येने परदेशी लोक संशयीत गुन्हेगारी कार्यात सामील असल्याचे आढळले आहे.

त्याचवेळी आणखी एक पोलिस अधिकारी होबिंद्र बोगटी म्हणाले की, चीनी दूतावासाला छाप्यांबद्दल माहिती होती आणि त्यांनी अटक केलेल्या लोकांचे समर्थन देखील केले होते.

तथापि, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले की, चीनने नेपाळ पोलिसांना या प्रकरणात सहकार्य केले आहे. चीन आपल्या शेजारी देशाबरोबर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य वाढविण्यास तयार आहे.

नेपाळ आणि चीनने ऑक्टोबरमध्ये राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या नेपाळ दौर्‍यादरम्यान गुन्हेगारी प्रकरणात परस्पर सहकार्याबाबत एक करारावर स्वाक्षरी केली होती. तसेच अलिकडच्या काळात चीन नेपाळमध्ये आपली गुंतवणूक वाढवत आहे.

चीनमधील नागरिकांवर असे आरोप प्रथमच झाले असे नाही. यापूर्वी अनेक आशियाई देशांमध्ये अशाच प्रकारच्या कार्यात ते सहभागी असल्याचे आढळून आले आहे.

मागील काही दिवसांत फिलीपाईन्समध्ये देखील पोलिसांनी ३४२ चिनी लोकांना अटक केली जे विना परवाना जुगार खेळत होते. यापूर्वी सप्टेंबरमध्ये पाच चिनी नागरिकांना एटीएम हॅक आणि त्यातून पैसे चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

तसेच ऑक्टोबरमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांच्या चौकशीत मंगोलियात ८०० चिनी नागरिकांना अटक करण्यात आली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/