नेपाळच्या पंतप्रधानांवर राजकीय संकट, मात्र राग काढला भारतीय वृत्तवाहिन्यांवर

काठमांडू : वृत्तसंस्था – नेपाळमध्ये एका बाजूला राजकीय संकट वाढ असताना दुसरीकडे आता भारतीय खासगी वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून दूरदर्शनला वगळण्यात आले आहे. भारतीय वृत्तवाहिन्यांविरोधात नेमपाळमध्ये ऑनलाइन मोहीम सुरु झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताविरोधी भूमिका घेतल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याबद्दल चुकीच्या बातम्या प्रसारीत करून त्यांची प्रतिमा डागळ्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय नेपाळमधील केबल ऑपरेटर संघटनेने घेतला असल्याचे समजते. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा, आदेश नेपाळ सरकारच्यावतीने काढण्यात आलेला नाही.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात सत्ताधारी नेपाळी कम्युनिस्ट पक्षात नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादाच्या आधारे पंतप्रधान केपी शर्मा ओली आपल्या अपयशांवर पांघरूण घातल असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, नेपाळमध्ये सध्या चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. भारताविरोधातल्या मुद्यावरून ओली सरकारच्या कम्युनिस्ट पक्षातच मतभेद आहेत. हे मतभेद सोडवण्यासाठी चीनचे राजदूत हस्तक्षेप करत आहेत.

भारतीय मीडियाच्या या भूमिकेबाबत ओली सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळ सरकारचे प्रवक्ते युवराज खतिवाडा यांनी पत्रकार परिषदेत भारतीय न्यूज चॅनलनी चीनच्या राजदूतांबद्दल दाखवलेल्या बातम्यांबाबत आक्षेप घेतले होते आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर नेपाळमध्ये भारतीय खासगी न्यूज चॅनलच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. दुसरीकडे नेपाळमध्ये चीनी आणि पाकिस्तानी चॅनलचं प्रक्षेपण सुरु राहणार आहे.