नेपाळमध्ये भारतीय बकऱ्यांच्या विक्रीवर बंदी, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळ सरकारने आरोग्य चाचणीचा हवाला देत नेपाळमध्ये भारतीय शेळ्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. नेपाळमध्ये दसर्‍याच्या उत्सवावर यज्ञ करण्याची प्रथा आहे ज्यात या बकऱ्यांचा बली दिला जातो. सुमारे आठ महिन्यांपूर्वी नेपाळ सरकारने भारतीय बकरीच्या आरोग्य चाचणीसाठी नेपाळहून भारतात येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे दसरा उत्सवासाठी बकऱ्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बकरीचे मांस नेपाळमधील काठमांडू आणि पोखरा येथे तब्बल एक हजार नेपाळी रुपये किलो या दराने विकले जात आहे. तरीदेखील ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. भारतातून दररोज नेपाळच्या शेळ्यांनी भरलेल्या जवळपास २० ते २५ ट्रक जात असत आणि एका ट्रकांमध्ये ४० ते ५० शेळ्या असत. परंतु बंदी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेळ्या पाठविणे बंद केले. व्यापारी यात मोठे नुकसान झाल्याने नाराजी व्यक्त करत आहेत.

नेपाळ भैरहवा कस्टम कार्यालयाचे प्रमुख कमल भटराई म्हणाले की नेपाळमध्ये बकरीची विक्री करण्यासाठी प्रथम आरोग्य चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे. बकरीस आरोग्य प्रमाणपत्र दिल्याशिवाय विक्री केली जाऊ शकत नाही. मात्र या सीमेवर दोन्ही देशांमध्ये चाचणी केंद्रे नाहीत. एसएसबीचे कमांडर सोनौली अमित कुमार यांनी सांगितले की बकरीच्या तस्करीबाबत माहिती मिळाली आहे. त्याबाबत सीमेवर सतर्कता असून यावर बारीक नजर ठेवली जात आहे.

२० ते २५ लाखांचे नुकसान :
नेपाळमध्ये भारतीय शेळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्या जातात. दसर्‍यामध्ये दररोज सुमारे २० ते २५ लाख शेळ्या नेपाळमध्ये पाठवल्या जात असत. परंतु बंदीमुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. नौतनवा येथील व्यापारी शमशाद खान यांनी सांगितले की, तपासणी प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था कलकत्ता येथे आहे. पण अन्यत्र कोठेही तपासणी प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था नाही. जवळपास तपासणीची प्रणाली असल्यास, कोणतीही अडचण आली नसती. बकरी बळी देण्याच्या प्रथेमुळे नेपाळमध्ये लोक दसऱ्यापूर्वी बकऱ्या विकत घ्यायचे. पण यावेळी खूप फटका बसला आहे. सीमेजवळ राहणारे लोक सोनौलीसह आसपासच्या बाजारातून बकरी विकत घेत आहेत.

Visit : policenama.com