Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

काठमांडू : वृत्तसंस्था – Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे (Yeti Airlines) ATR-72 विमान पोखराजवळ अपघातग्रस्त झालं आहे. काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारे यती एअरलाइन्सचं विमान आज (रविवार) सकाळी कास्की जिल्ह्यातील (Kaski District) पोखरा येथे कोसळलं. विमानात (Nepal Plane Crash) एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. विमान अपघातात आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बाचावकार्य करतानाचे फोटो समोर आले आहेत. विमानाचा अपघात झाल्यानंतर लगेच
आगीचे लोट आणि धूराचे लोट असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विमानात दहा विदेशी नागरिक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाच भारतीय होते.

खराब हवामान असतानाही विमानाने उड्डाण केल्याचे समोर आले आहे.
एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पायलट कॅप्टन कमल केसी (Pilot Captain Kamal Casey) हे विमान उडवत होते.
पोखरा येथील सेती खोच येते हे विमान कोसळले असून त्यानंतर विमानाला आग लागली.
यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला (Spokesperson Sudarshan Bertaula) यांनी सांगितले
की, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत बचावकार्य़ वेगात सुरु आहे. अनेकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

Web Title :- Nepal Plane Crash | nepal plane crash flight to pokhra from kathmandu got crashed 702 passengers were on board

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा; स्क्रीन शॉट पाठवून महिलेची केली 8 लाखांची फसवणूक

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंधाचे फोटो नातेवाईकांमध्ये केले व्हायरल