पाकिस्ताननंतर ‘या’ देशानं भारताच्या नकाशावर दर्शविला विरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जारी केलेल्या नवीन नकाशाबद्दल नेपाळने विरोध दर्शवला आहे. नेपाळने दिलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, कालापानीला भारताच्या नकाशात स्थान दिल्याने नेपाळने नाराजी दर्शवली आहे. सध्या नवी दिल्लीमध्ये सध्या काठमांडू आणि नवी दिल्लीच्या सीमेवरून चर्चा सुरु आहे. नेपाळच्या विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले आहे कि, कालापानी हा नेपाळचा अविभाज्य भाग असून आम्ही नेपाळच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे सरंक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत.

त्यासाठी आम्ही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करणार असून चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवू. यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांना जबाबदारी देण्यात आली असून ते यावर मार्ग काढतील. भारताने जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर लडाख आणि जम्मू काश्मीर या केंद्र शासित प्रदेशांसह नवीन नकाशा प्रकाशित केला होता. त्यानंतर उत्तराखंडमध्ये कालापानी या ठिकाणाला समाविष्ट केल्याने नेपाळने नाराजी दर्शवली आहे.

नेपाळ कालापानी या ठिकाणाला आपल्या दारचूला जिल्ह्यात दाखवत असतो. नेपाळच्या या वक्त्यव्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने यावर कोणतीही प्रतिक्रिया आली पासून भारत आणि नेपाळचे संबंध चांगले असल्याने ते जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दरम्यान, याआधी पाकिस्तानने देखील भारताच्या नकाशाला विरोध दर्शवला होता.

गिलगिट-बाल्टिस्तान आणि अन्य त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाला भारतीय राज्य जम्मू काश्मीरमध्ये दाखवल्याने विरोध दर्शवला होता. याविषयी त्यांनी म्हटले होते कि, भारताच्या वतीने जारी करण्यात आलेला हा नकाशा अवैध असून आम्ही याचा विरोध करत आहोत.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके