नकाशा जाहीर केल्यानंतर देखील सुधरला नाही नेपाळ, FM रेडिओवर ‘लिपुलेख’, ‘कालापानी’ आणि ‘लिंपियाधुरा’चं जारी केलं हवामानाचं बुलेटिन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळच्या संसदेकडून नवीन राजकीय नकाशा ज्यात भारतीय भागातील लिपुलेख, कालापानी और लिंपियाधुराला आपला भाग सांगत समावेश करण्यात आला होता, त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता तेथील काही एफएम रेडिओ वाहिन्यांनी हवामान बुलेटिन देणे सुरू केले आहे. भारत-नेपाळ सीमेजवळील उत्तराखंडच्या पिथौरागडमधील काही नेपाळी एफएम रेडिओ स्टेशनद्वारे या तीन ठिकाणांविषयी हवामान माहिती प्रदान केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे एफएम रेडिओ स्टेशन्स नेपाळच्या धारचुला येथे आहेत आणि धारचुला, बालुकोट, जौलजीबी आणि कालिका शहरांसारख्या सीमावर्ती भागात ऐकायला मिळतात. धारचुलातील रूंग समुदायाचे प्रख्यात नेते कृष्ण गरबियाल म्हणाले की, या नेपाळी एफएम स्थानकांनी कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुराला आपला भाग मानत त्या भागातील माहिती देण्यास सुरूवात केली आहे, जसे भारताने पाकव्याप्त काश्मिरात केले आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान खात्याने मुझफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तानसारख्या पाकव्याप्त काश्मीरच्या भागाविषयी हवामानाची माहिती देण्यास सुरवात केली होती.

सीमावर्ती स्थानिक भागात राहणाऱ्या लोकांचे विशेषत: धारचुला येथे राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की नेपाळच्या वतीने एफएम वाहिन्यांनी नेपाळी गाण्यांमध्ये नेपाळी राजकारण्यांचे भाषण लावून प्रचार चालवला आहे की हे भाग नेपाळचे आहेत. भारताच्या वतीने लिपुलेख पास रोडच्या उद्घाटनापासून नेपाळच्या एफएम वाहिन्यांनी गाण्यांमध्ये अशी भाषणे सुरू केली आहेत याची खात्री धारचुलाच्या लोकांनी दिली आहे. धारचुला येथील दंतू खेड्यातील रहिवासी शालू दयाल यांनी सांगितले की, ‘सीमेच्या दोन्ही बाजूचे लोक नेपाळी गाणी ऐकतात, अशा वेळी नेपाळी नेत्यांनी वेळोवेळी ज्या प्रकारचे भारतविरोधी भाषणे दिली आहेत त्याने लोकांच्या विचारसरणीवर परिणाम होतो. असे करून ते दोन्ही बाजूंच्या लोकांच्या नात्यात भांडणे निर्माण करीत आहेत.’