बलात्कार प्रकरणी ‘या’ देशातील संसदेच्या अध्यक्षाचा राजीनामा

काठमांडू : वृत्तसंस्था – नेपाळच्या संसदेचे अध्यक्ष कृष्णा बहादुर महरा यांच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संसदीय सचिवालयातील महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर महारा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सभापतींनी आपला राजीनामा विधानसभेचे उपसभापती शिवमाया तुम्बामफे यांच्याकडे सादर केला.

राजीनामा देताना महारा म्हणाले की आरोपांची निःपक्षपणे चौकशी व्हावी म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महार यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले. हमरो कुरा या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये पीडित महिलेने असा दावा केला आहे की तिची माहारा यांच्याशी ओळख होती आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला.

काय आहे आरोप :
या महिलेचा असा दावा आहे की २३ सप्टेंबर रोजी जेव्हा ती भाड्याच्या घरात एकटी होती तेव्हा महारा तिला भेटायला आले होते. पीडितेचा आरोप आहे की तिने नशेत असल्याने महारांना घरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी जबरदस्तीने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला.

हिमालयीन टाईम्सच्या वृत्तानुसार, नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवालयाने मंगळवारी यापूर्वी बैठक घेतली होती, ज्यामध्ये महारा यांनी सभापतीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मिळालेल्या वृत्तानुसार, सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते नारायण खाजी श्रेष्ठ म्हणाले की, महार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असा निर्णय सचिवालयाच्या बैठकीत घेण्यात आला आहे जेणेकरून त्यांच्यावरील आरोपांची निःपक्षपातीपणे चौकशी होईल.

Visit : policenama.com