नेपाळी सिनेमातील उदित नारायण, मनिषा कोईराला यांच्यासह ‘या’ 10 स्टार्संनी बॉलिवूडमध्ये मिळवलं यश !, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज आपण अशा 10 नेपाळी स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी नेपाळी सिनेमाव्यतिरीक्त बॉलिवूडमध्ये वेगळी अशी त्यांची ओळख तयार केली आहे.

1) उदित नारायण झा – 1970 मध्ये रेडिओ नेपाळमध्ये मैथिली लोक गायक म्हणून करिअरला सुरुवात करणारे उदित नारायण आज बॉलिवूडमधील मोस्ट सक्सेसफुल सिंगर्सपैकी एक आहेत. नेपाळी म्युझिकमध्ये 8 वर्षे घालवल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. इथं 1980 मध्ये त्यांनी आपल्या करिअरला नवीन सुरुवात केली होती. आज त्यांना इंटरनॅशनल लेवलवरही ओळखलं जातं.

2) माला सिन्हा – नेपाळी-ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या माला सिन्हाला तर प्रत्येकजण ओळखतो. हिंदी सिनेमातील दिग्गज अदाकारा माला सिन्हा हिनं बंगली सिनेमातून अ‍ॅक्टींग करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिनं नेपाळी सिनेमातही काम केलं. हळूहळू ती हिंदी सिनेमाकडे वळाली आणि एकेक शिखर गाठू लागली. तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे.

3) भोला राज सपकोटा – रणबीर कपूरच्या बर्फी सिनेमात त्याच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता हा नेपाळी अ‍ॅक्टर भोला राज सपकोट आहे. भोलानं या सिनेमात चांगलं काम केलं आहे.

4) मनीषा कोईराला – मनीषा आज बॉलिवूडमधील पॉप्युलर अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. तिनं अर्ध बालपण हे भारतातच घालवलं आहे. मॉडेलिंग करून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं आहे. अनेक हिट सिनेमात तिनं काम केलं आहे.

5) पूर्णिमा श्रेष्ठा –पूर्णिमा बॉलिवूडमधील फेमस प्लेबॅक सिंगर आहे. तिला सुषमा श्रेष्ठा म्हणूनही ओळखलं जातं. तिन चाईल्ड आर्टीस्ट म्हणूनच आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रमेश सिप्पीच्या अंदाज सिनेमातील है ना बोलो बोल या गाण्याला तिनंच आवाज दिला आहे. यानंतर तिनं तेरा मुझसे है, क्या हुआ तेरा वादा यात काम केलं. माधुरीचं फेमस गाणं चने के खेत में या गाण्याला तिनं आवाज दिला आहे.

6) आदित्य नारायण झा – सिंगर उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायण झा याचा याचा जन्म तसा तर भारतातच झाला आहे. तो भारतातच मोठा झाला आहे. नेपाळी कुटुंबात जन्मलेल्या आदित्यनंही आपल्या प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान तयार केलं आहे. चाईल्ड आर्टीस्ट म्हणून हिंदी सिनेमात काम केल्यानंतर त्यानं सिंगिंगला सुरुवात केली. आज तोही सक्सेसफुल सिंगरच्या यादीत आहे.

7) सुनील थापा – नेपाळी सिनेमातील विलन सुनील थापा थापा हिंदी सिनेमातील प्रसिद्ध चेहरा आहे. राते काईले नावानं नेपाळमध्ये फेमस सुनील थापा यांनी मुंबईत मॉडेलिंग केल्यानंतर अ‍ॅक्टींगकडे मोर्चा वळवला होता. 1981 साली आलेल्या एक दुजे के लिए सिनेमातून अ‍ॅक्टींग डेब्यू केला होता. यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी सिनेमात काम केलं होतं. प्रियंकाच्या मेरी कॉम सिनेमानं त्यांना वेगळीच ओळख मिळाली.

8) तेरिया मगर – 2014 साली तेरिया मगरनं लिटिल मास्टर्स डान्सिंग कॉम्पिटीशनचा किताब जिंकला होता. तेरियानं झलक दिखला जा सीजन 9 देखील जिंकला होता.

9) झरना ब्रजाचार्य – काठमांडूची अ‍ॅक्ट्रेस झरनानं अनेक ब्युटी पेजेंट जिंकल्या आहेत. 1997 मध्ये तिनं मिस वर्ल्ड स्पर्धेत नेपाळचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 2004 साली आलेल्या लव इन नेपाल सिनेमात तिनं काम केलं आहे. सोनू निगमनं यात लिड रोल केला होता.

10) उषा पौडेल – नेपाळच्या जनकपूरमध्ये जन्मलेली उषा पौडेलनं नेपाळी सिनेमात काम केल्यानंतर हिंदी सिनेमात नशीबा आजमावलं होतं. खूप स्ट्रगल केल्यानंतर उषाला काम मिळालं होतं. तिनं टीव्ही सीरियलमध्येही काम केलं आहे.