‘या’ नेपाळी अ‍ॅक्ट्रेसची ‘देसी गर्ल’ प्रियंकासोबत होते तुलना, HOT अंदाजामुळे चर्चेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेपाळी अ‍ॅक्ट्रेस प्रियंका कार्की नेपाळी सिनेमातील आपल्या अभिनय आणि बोल्ड स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. प्रियंका नेहमीच चर्चेत असते. अवघ्या 7 वर्षात तिने आपलं वेगळं स्थान तयार केलं आहे.

तिच्या टॅलेंटमुळे अनेकदा तिची तुलना बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडासोबत होते. प्रियंका कार्कीचा जन्म 27 फेब्रुवारी 1987 मध्ये नेपाळच्या काठमांडूमध्ये झाला. तिचे वडिल भूपेंद्र कार्की तर आई रक्षा मल्होत्रा कार्की आहे. तिच्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

आपल्या चांगल्या अ‍ॅकेडेमिकमुळे तिला ब्युटी विथ ब्रेनही म्हटलं जातं. तिने ब्युटी पेजेंटमध्ये भाग घेतला आहे. ती मिस टीन नेपाल म्हणूनही निवडली गेली आहे. नंतर तिने कांतीपूर टेलिव्हिजनच्या सेलुलॉयड नावाच्या शोमध्ये काम केलं. नंतर तिने स्वत:चा फॅशन आणि लाईफस्टाईल प्रोग्राम द ग्राम फॅक्टर सुरू केला.

नेपाळची चौथी सर्वात सेक्सिएस्ट महिला
प्रियंकाने आपलं हायर एज्युकेशन अमेरिकेतून पूर्ण केलं. तिने युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ अलाबामामधून फिल्म मेकिंगमध्ये हायर डिग्री घेतली. सिनेमात नशीब आजमावण्यासाठी प्रियंकाने मिस टीन नेपाळ, व्हीजे, सिंगर, कोरियोग्राफर आणि मॉडेल म्हणून काम केलं आहे. एका रिपोर्टनुसार, प्रियंकाला नेपाळची चौथी सर्वात सेक्सिएस्ट महिला म्हणून निडण्यात आलं होतं.

जर्नलिस्टने प्रियंका विरोधात केस दाखल केली
प्रियंका अनेकदा वादातही सापडली आहे. तिच्या 2014 साली आलेल्या नाई ना भन्नू ला 2 या सिनेमाच्या सक्सेस पार्टीदरम्यान एका जर्नलिस्टने प्रियंकाचा फोटो घेतला होता. यात तिची अंडरवियर हायलाईट झाली होती. या प्रकरणी तिने फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनला लेटर पाठवलं होतं. तिचं म्हणणं होतं की, तिचा फोटो फोटोशॉप करण्यात आला आहे. तेव्हा त्या जर्नलिस्टने प्रियंका विरोधात केस दाखल केली होती. यानंतर मात्र तिने टीशर्ट टग इन केल्याने असं होऊ शकतं असं म्हणत हे प्रकरण दाबलं होतं.

प्रियंका उत्तम सिंगरही आहे. ज्याप्रमाणे बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा अभिनयासोबतच सिंगिंग साठीही प्रसिद्ध आहे तशीच प्रियंका कार्की देखील सिंगिंसाठीही प्रसिद्ध आहे. आवारन या सिनेमाने प्रियंका कार्कीने सिंगिंगला सुरुवात केली होती. तिच्या तिली ले ता गोईंग नावाच्या व्हिडीओला 24 तासात 50 हजारांहून अधिक व्ह्युज आणि 500हून अधिक शेअर्स मिळाले होते.

यावर्षी फ्रान्समध्ये झालेल्या कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये प्रियंकाने नेपाळंच प्रतिनिधित्व केलं होतं. 72 व्या कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये तिला नेपाळ फिल्म इंडस्ट्रीची पहिली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आलं होतं. त्याआधी अ‍ॅक्ट्रेस अंजली लामाही या फेस्टीवलचा हिस्सा बनली आहे. सोशलवर प्रियंका कार्कीला प्रियंका चोपडाच्या अंदाजात फोटो काढण्यासाठी ट्रोलही करण्यात आलं आहे.

प्रियंकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, 22 वर्षांची असताना तिने रोचक मैनाली सोबत लग्न केलं होतं. परंतु 2 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. सध्या ती अ‍ॅक्टर मॉडेल आयुष्मान देशराज सोबत एंगेज्ड आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या एज गॅपचीही खूप चर्चा होताना दिसली. कारण तो प्रियंकापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 2012 साली तिने 3 लव्हर्स मधून सिनेमात डेब्यू केला होता. यानंतर तिने कॉलिवूड, व्हिजीलेंट 3 डी, कर्कश, नेपतिया, झोलो, नाई ना भन्नू ला 2, आवारन, मेरो बेस्ट फ्रेंड, हसिया, कबड्डी कबड्डी, छक्का पंजा, छक्का पंजा 2, नाई ना भन्नू ला 3, प्रेम दिवस अशा अनेक सिनेमात काम केलं. 2015 साली आलेल्या सुन्ताली या सिनेमातील प्रियंकाच्या भूमिकेचं खूप कौतुक होताना दिसलं. तिला अभिनयासाठी नॅशनल फिल्म क्रिटीक्स अवॉर्ड आणि नॅशनल फिल्म अवॉर्ड्सने 2017 ने गौरवण्यात आलं आहे.

visit : policenama.com