100 रुपयांचा वाद जिवावर बेतला, काठीने प्रहार करून पुतण्याने काकाला मारले ठार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मासेविक्रीतून मिळालेल्या केवळ 100 रुपयांच्या वाटणीवरून वाद झाल्याने संतप्त पुतण्याने वृद्ध काकाच्या डोक्यात काठीने प्रहार करून ठार मारले. संतकबीरनगर जिल्ह्यातील कोतवाली परिसरातील चौरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 20 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद अली ( वय 65) असे मृत्यू पावलेल्या काकाचे नाव आहे. लियाकत (वय 20) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पुतण्याचे नाव आहे.

सय्यद अली यांची पत्नी हसीना खातून यांनी सांगितल्यानुसार, तिचा धाकटा मुलगा अली हसन ऊर्फ मुसे दोन दिवसांपूर्वी अमी नदीत मासेमारीसाठी गेला होता. पुत्राबरोबर भाचा लियाकतदेखील होता. मुलाने घरी आणलेले मासे पती सय्यद अली यांनी 200 रुपयांना विकले होते. त्यानंतर पुतण्या लियाकत हा त्याच रकमेचा हिस्सा म्हणून 100 रुपये मागत होता. मुलगा आणि पुतण्यांमधील वाद वाढला. जेव्हा मी मध्यस्थी करण्यास आले तेव्हा लिकायतने मला आणि मुलाला पकडले. नंतर नवरा सय्यदकडे वळला. पतीच्या डोक्यावर निशाना साधताना भाचा लिकायतने काठीने प्रहार केला. पती जखमी झाल्याने रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एसपी ब्रजेश सिंह म्हणाले की, या प्रकरणी मृताची पत्नी हसीना खातून यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी लिकायतविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कोतवाल यांना आरोपीला लवकरच अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.