नागपूरात भाच्यानेच केली मामाची हत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

घरगुती वादातून हत्या केल्याची घटना नागपुरातील राणाप्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोखंडे नगरात घडली. मृत इसमावर वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रविण उर्फ पप्पू देवराव वंजारी असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मृत प्रविणचा भाचा व त्याच्या साथीदाराला ५ तासांतच अटक केली.

[amazon_link asins=’B009WNA9V6,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97caef0f-aff4-11e8-bcfa-232c8000381e’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत प्रविण हा त्याची पत्नी आणि ५ बहिणींसोबत राहत होता. प्रविणची पहिली बायको वेगळी राहात आहे तर दुसरी बायको त्याच्या सोबत राहाते. त्याचे जुने घर मोडकळीस आल्याने तिथे नवीन घराचे बांधकाम सुरु होते. त्यामुळे ते सध्या सहकुटुंब स्वावलंबी नगरात वास्तव्यास आले होते. काही दिवसांपूर्वी प्रविणचा मोठ्या बहिणीचा मुलगा शुभमसोबत वाद झाला होता. त्यावेळी प्रविणने शुभमला मारहाण केली होती. त्यानंतर त्याच दिवशी प्रविणची गाडीसुद्धा चोरीला गेली होती. प्रविणने शुभमवर गाडी चोरीचा आरोप केला होता. तो सतत शुभमला गाडीसाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या शुभमने त्याच्या मित्राच्या मदतीने मामाचा काटा काढण्याची योजना आखली.

भावी पतीबरोबर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहीक बलात्कार

नेहमीप्रमाणे प्रविण नवीन घराचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी शुभम आणि योगेश सुद्धा तेथे पोहोचले. प्रविणकडे नेहमीच शस्त्र बाळगत असल्याचे माहिती असल्याने आरोपींनी त्याच्यावर योजनाबद्ध पद्धतीने हल्ला चढावला. परंतु, प्रविण तेथून चलाखीने निसटला. त्यानंतर तो शुभमला मारण्यासाठी निघाला असता शुभमने त्याला गाठून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना लगेच तपासाला सुरूवात अवघ्या ५ तासात आरोपींना अटक केली.

महिलेने केले पुरुषावर कुऱ्हाडीने वार