Video : ‘ना छापा, ना काटा’, TOSS ची विचित्र घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टॉस केल्यानंतर तो सरळ जमिनीवर येऊन उभा राहिल्याचे अनेकदा आपण घरी खेळताना किंवा क्रिकेट खेळताना घडते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर असे घडलेलं आपण कधीही पाहिलेले नाही. मात्र शोले सिनेमात ज्याप्रकारे नाणे उभे राहिल्याचा प्रसंग दाखवला गेला आहे अगदी तसाच प्रसंग मलेशियात झालेल्या अंडर -१९ क्रिकेट सामन्यात घडल्याचे पाहायला मिळाले.

काल नेपाळ आणि हाॅंगकाॅंग यांच्यात अंडर- १९ एसीसी (एशियन क्रिकेट काऊंसिल) ईस्टर्न रीजन २०१९ या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. मात्र या सामन्यावेळी घडलेल्या प्रकाराने सर्वजण चकित झाले. यावेळी टॉस उडवल्यानंतर तो जमिनीवर येऊन थेट उभा राहिला. यामुळे दोन्ही कर्णधारांसह अंपायर देखील चकित झाले. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी पुन्हा टॉस उडवायला सांगितला. नेपाळने टॉस जिंकला आणि फिल्डींगचा निर्णय घेतला. हा किस्सा घडल्यानंतर या संदर्भात एशियन क्रिकेट काऊंसिलने ट्विट करत याचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर आयसीसीची नजर गेली असता आयसीसीने हि पोस्ट रिट्विट करत “तुम्ही यापूर्वी असं कधी पाहिलं होतं का?” असं म्हटलं आहे.त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकत फिल्डींगचा निर्णय घेतल्यानंतर मलेशियाला ९५ धावांत सर्वबाद करून १६ षटकात ९६ धावा करत शानदार विजय मिळवला.

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या