नीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक

0
130
nera
nera

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन  –  नीरा गावातील सम व विषम पार्किंग सुरळीत करण्यात येणार असून दर बुधवारी आठवडी बाजारादिवशी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विनामास्क आढळणा-या दुकानदारांवर व फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जेजुरीचे प्रभारी अधिकारी सुनिल महाडिक यांनी सांगितले.

आठवडी बाजाराला जेजुरीचेे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांंनी पथकासह भेट दिली. तत्पुर्वी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पोलिस कर्मचारी स्पिकरवरून विनामास्क फिरण्यांंना मास्क वापरण्याचे आवाहन करीत होते.यावेळी आठवडी बाजारात विनामास्क भाजी व फळ विक्री करणा-या दुकानदार व  फिरणाऱ्या ५० जणांवर दंडात्मक कारवाई करून पाच हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.

यावेळी पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्यासह , फौजदार कैलास गोतपागर, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, पोलिस काँन्स्टेबल धर्मवीर खांडे, निलेश जाधव व कर्मचा-यांंनी सहभाग घेतला.

यावेळी महाडिक पुढे म्हणाले कि, नीरा हे गांव कृषी, सामाजिक व राजकिय दृष्ट्या महत्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तो पर्यंत विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. नीरा हे गांव पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील असून याठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात येणार आहे. तसेच नीरा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी दर बुधवारी नीरा पोलिस दुरक्षेत्रात नागरिकांना भेटणार असल्याची माहिती दिली.

नीरा येथेे यापुर्वी सम- विषम असे पार्किंग केले असून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना बाजारपेठेत सोईस्कररित्या फिरता यावे . नागरिकांना कोणाताही त्रास देण्याचा उद्देश नसून वाहतुक कोंडी होऊ नये याकरिता नागरिकांच्या हिताकरिता सम – विषम पार्किंगची सक्त अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक म्हणाले.