नीरा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर फवारणी मशिनचा लोकार्पण

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे,मुंबईसह राज्यात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजविला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणचे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यासाठी आमदार संजय जगताप यांच्या आमदार फंडातून नीरा ग्रामपंचायतीला सॅनिटायझर फवारणी मशिन (टँक्टर ऑपरेटर एअर असिस्टेड स्प्रेअर ) देण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि.१६) नीरा (ता.पुरंदर ) येथे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे , प्रदीप पोमण , रमणिकलाल कोठडीया,जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, माजी सरपंच राजेश काकडे, चंदरराव धायगुडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, सरपंच दिव्या पवार, उपसरपंच विजय शिंदे, ग्रा.पं. सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, दिपक काकडे, बाळासाहेब भोसले, गणपत लकडे यांच्यासह बाळासाहेब ननवरे, जावेद शेख, संदेश गायकवाड, वैशाली काळे आदी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांंमध्ये सॅनिटायझर करणे आवश्यक आहे.ही गरज ओळखून पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी आमदार फंडातील पहिल्याच निधीतून नीरा ग्रामपंचायतीला दिड लाख रुपये किमतीची सॅनिटायझर फवारणी मशीन दिली त्यामुळे नीरा गावात सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यास मदत होणार आहे. यावेळी ग्रा.पं. सदस्य दिपक काकडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले.