नीरेत Lockdown च्या काळात इतर आस्थापना चालू दिसल्यास ‘सील’ करणार – तहसीलदार रूपाली सरनोबत

नीरा (ता.पुरंदर) : पोलीसनामा ऑनलाइन – यथील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करून लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापने चालू दिसल्यास त्यांना सील करणार असल्याचा इशारा पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिला.

नीरा (ता.पुरंदर) येथे क्वारंटाईन सेंटर किंवा कोरोना केअर सेंटर उभारण्या बाबत तपासणी करण्याकरिता पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत निरा येथे आल्या होत्या. त्यावेळी नीरा ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी विवेक अबनावे, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, विजय शिंदे, वैशाली काळे, ग्रामसेवक मनोज डेरे, मंडलाधिकारी संदीप चव्हाण , पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, तलाठी बजरंग आसवले यांच्यासह आदी ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.
तहसीलदार सरनोबत म्हणाल्या की, लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या नियमांत जी अस्थापने बंद आहेत ती अस्थापने चालू राहिल्यास त्या अस्थापनांचा अहवाल पोलिसांनी द्यावा. त्यानंतर संबंधित अस्थापनांना कलम १८८ नुसार सासवडप्रमाणे नीरा येथेही सील करणार असल्याचा इशारा तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिला.

तसेच नीरा येथे क्वारंटाईन सेंटर किंवा सीसीसी सेंटर चालू करण्याकरिता काही तांञिक अडचणी आल्या असून याकरिता वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे. दरम्यान, नीरा प्रा. आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेञातील गावामधील नागरिकांची गर्दी होत असून त्याकरिता ज्या त्या गावांत लसीकरण सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे नीरेतील लोकांचे जादा प्रमाणात लसीकरण करण्यास मदत होणार आहे.

होमआसोलेशन मधील रूग्णांना दररोज तलाठी ग्रामसेवकांनी भेट द्यावी – तहसीलदार

नीरा येथील होमआयसोलेशन मधील रूग्ण घरातच आहेत का हे पाहणी करण्यासाठी नीरेचे तलाठी व ग्रामसेवक यांनी संबंधित रूग्णांच्या घरी भेट द्यावी. तसेच जे रूग्ण ऐकणार नाहीत अशा रूग्णांवर पोलिसांमार्फत कारवाई करा अशा सुचना पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी
तलाठी व ग्रामसेवकांना दिल्या.

– विनाकराण फिरणा-यांची अँटिजेन कोरोना टेस्ट करणार – पोलिस निरीक्षक महाडिक

नीरा गावामध्ये लॉकडाऊनच्या काळात जी व्यक्ती विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्यांची अँटिजेन कोरोना टेस्ट करण्यात येणार असून त्यांच्यांवर सक्त दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक व शासकीय मालमत्तेच्या सुव्यवस्थेचा कोणी प्रश्न निर्माण केल्यास अशांवर पोलिस बळाचा वापर करण्यात येणार असल्याचा इशारा जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिला.

नीरा गावातील कोणती दुकाने केंव्हा चालू राहणार

– सकाळी सात ते दहा व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत मटन, चिकण, मासे, तसेच पार्सल सेवेकरिता वडापाव विक्रीचे हातगाडे व इतर खाद्यपदार्थांचे दुकाने आदी अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू राहणार
– सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत किराणा, फळे, शेतीशी संबंधित भाजीपाला व इतर दुकाने चालू राहणार