नेट परीक्षा होणार आता “ऑनलाईन”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नुकत्याच जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार डिसेंबर महिन्यात घेण्यात येणारी नेट परीक्षा ही ऑफलाईन’ ऐवजी ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट ही परीक्षा आता ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे. आतापर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अर्थात ‘सीबीएससी’तर्फे घेतली जाणारी ही स्पर्धा आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेतली जाणार आहे. ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सोईस्कर होईल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही मनुष्यबळ विकास मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत असिस्टंट प्रोफेसर किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशिप या दोन्ही पदांसाठी नेट परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. नऊ ते २३ डिसेंबर दरम्यान ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल, असे ‘एनटीए’तर्फे स्पष्ट केले गेले आहे.

IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटही सापडली

सीबीएसई’तर्फे दरवर्षी सहायक प्राध्यापकपदासाठी “नेट’ परीक्षा घेण्यात येत असते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच नेट परीक्षेत “सीबीएसई’कडून काही मूलभूत बदल करण्यात आले होते. दरम्यान, या परीक्षेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून, डिसेंबर महिन्यात होणारी परीक्षा ही ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोईस्कर झाले आहे.

अभ्यासक्रमात बदल नाही

नेट परीक्षेच्या नवीन नियमानुसार अभ्यासक्रम, पेपरची वेळ, यांसह इतर बाबी तशाच आहे. फक्त ऑफलाईचे रूपांतर ऑनलाईनमध्ये करण्यात आले आहे. यात पूर्वीप्रमाणेच पहिला पेपरला सामान्य ज्ञान विषयाचा असेल तर दुसरा पेपरा आपल्या विषयाशी निगडित होईल.

अटक केलेल्या ‘त्या’ पाच जणांना देशभरात अराजकता माजवायची होती

[amazon_link asins=’B07437YHXP,B0763NC295′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76025003-b0f1-11e8-9c95-77f30ddde4c9′]