‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी केली जाईल ‘सुभाषचंद्र बोस’ यांची जयंती, मोदी सरकारकडून घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख चेहरा म्हणजे सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाईल, अशी माहिती संस्कृती मंत्रालयाने दिली आहे. तत्पूर्वी, नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वीरता सर्वश्रुत आहे. आम्ही लवकरच नेताजींसारख्या स्कॉलर, सोल्जर आणि स्टेट्समनची 125 व्या जयंती संबंधित कार्यक्रमांची घोषणा करू.

स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. त्याचबरोबर, सांस्कृतिक मंत्रालयाने अधिकृत प्रकाशन देखील जारी केले आहे की ही समिती 23 जानेवारीपासून पुढे एका वर्षापर्यंत या 125 व्या जयंतीच्या वर्षात आयोजित केले जाणारे कार्यक्रम आणि उत्सवांचे वेळापत्रक ठरवेल.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त राजनाथ सिंह, अमित शहा, ममता बॅनर्जी, जगदीप धनकड, मिथुन चक्रवर्ती, काजोल आणि ए.आर. रहमान यांच्यासह 84 जणांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे.

नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त गठित समितीत कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि टीएमसी मधून भाजपमध्ये आलेले शुभेंदु अधिकारी यांचा देखील समावेश आहे.