Netflix फ्री ऑफर – अकाऊंट नसले तरी फ्रीमध्ये पहा सीरीज आणि फिल्म्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेटफ्लिक्स आता आपले काही टीव्ही शोज आणि फिल्मचे फ्री अ‍ॅक्सेस देत आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्सवर अकाऊंट बनवण्याची गरज नाही आणि सबस्क्रिपशन घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. मात्र यामध्ये जाहिरातींचा भरमार असणार आहे.

लिमिटेड सीरीज आणि फिल्म्स फ्री
नेटफ्लिक्सच्या या फ्री ऑफरअंतर्गत नेटफ्लिक्सची फ्लॅगशिप सीरीज स्ट्रेंजर गेमसह पॉप्युलर फिल्म बर्ड बॉक्ससुद्धा पाहू शकता. याशिवाय व्हेन दे सी अस, लव इज ब्लाइंड आणि बॉस बेबी सारखा कन्टेन्ट आहे.

अकाऊंट नसताना पहा
यापूर्वी नेटफ्लिक्सकडून अशी ऑफर कधीही देण्यात आलेली नव्हती. मात्र, कंपनीजवळ एक महीन्याची ट्रायल ऑफर जरूर होती. यासाठी अकाऊंट तयार करून क्रेडिट कार्डच्या डीटेल्स सुद्धा भराव्या लागत होत्या. याशिवाय कधी कधी कंपनी एखाद्या सीरीजचा एपिसोड फ्री करत होती.

लॅपटॉपवरून सुद्धा होणार अ‍ॅक्सेस
नेटफ्लिक्सच्या या फ्री ऑफर अंतर्गत टोटल 10 फिल्म आणि सीरीज आहेत. हे पाहण्यासाठी तुम्ही Netflix.com/in/watch-free वर जाऊ शकता. येथे तुम्हाला लॉग इन किंवा साइन अप करण्याची आवश्यकता नाही आणि डायरेक्ट या 10 सीरीज आणि फिल्म पैकी काहीही पाहू शकता.

स्ट्रेंजर थिंग्सचा सुद्धा अ‍ॅक्सेस
ओटीटी प्लॅटफॉर्म सतत वाढत असल्याने, नेटफ्लिक्सवर सुद्धा नव्या ऑफर्स आणण्याचा दबाव असल्यासारखे आहे. भारतीय मार्केटबाबत बोलायचे तर कंपनीने मोबाइल ओन्ली प्लॅन खुप अगोदरच स्वस्त केला आहे. नुकतेच नेटफ्लिक्सने आपला युजर इंटरफेस हिंदीमध्ये सुद्धा लाँच केला आहे. हा केवळ भारतासाठीच नव्हे तर, वर्ल्ड वाईड आहे. म्हणजे कुठेही नेटफ्लिक्सची लँग्वेज बदलून हिंदी करता येईल.