सर्वोच्च न्यायालयाने नेटफ्लिक्सची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नेटफ्लिक्सवरील ‘बॅड बॉय बिलियनेयर्स’ या वेबसिरीजवर बंदी घालण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने या वेबसिरीजमध्ये वापरण्यात आलेल्या ‘सुब्रत राय हे नाव वापरु नये’, बिहारच्या एका न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने नेटफ्लिक्सला या वेबसिरीजच्या प्रकरणासंदर्भात पटना उच्च न्यालयात जाण्याचा सल्ला दिला. बिहारच्या एका न्यायालयाने दिलेल्या न्यायालाच्या आदेशाविरोधात नेटफ्लिक्समे आव्हान दिले होते. त्यामध्ये नेटफ्लिक्सने आपली आगामी वेबसिरीज ‘बॅड बॉय बिलियनेयर्स’मध्ये सुब्रत राय यांच्या नावाचा उपयोग करण्यावर बंदी घातली होती.

मुख्य सचिव एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने नेटफ्लिक्सला बिहारच्या अररिया जिल्ह्याच्या न्यायालायाच्या निर्णयाविरोधात पटना उच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली आहे. खंडपीठाने याचिका फेटाळत सांगितले की, याचिका फेटाळली जात आहे, आम्हाला माफ करा. नेटफ्लिक्स २ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीजचे प्रमोशन करत आहे. यामध्ये सांगितले आहे की, या डॉक्युमेंट्रीमध्ये भारतातील कुख्यात उद्योपतींना उभे करणारे आणि त्यांना मारणारे लालची भ्रष्टाचाराला दाखविण्यात आले आहे.