‘नेटफ्लिक्स’चा मोठा धमाका ! ‘गुंजन सक्सेना’, ‘लूडो’सहित 17 नवीन प्रोजेक्ट्सची घोषणा

पोलिसनामा ऑनलाइन – बुधवारी (दि 15 जुलै) सोशल मीडियावर #ComeOnNetflix ट्रेंड करत होता. या हॅशटॅगसोबत अनुराग कश्यप, राजकुमार राव, काजोल, यामी गौतम, जान्हवी कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी सहित इतर अनेक बॉलिवूड स्टार्सनं नेटफ्लिक्सबद्दल सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केले होते. सर्वांनाची आपापल्या व्हिडीओत नेटफ्लिक्सला सवाल केला होता की, कधीपर्यंत सर्व काही लपवून ठेवणार आहे. आता घोषणा करायला हवी.

हे व्हिडीओज समोर आल्यानंतर नेटफ्लिक्सनं आपल्या नवीन प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. यावेळी एक किंवा दोन नव्हे तर 17 नवीन सिनेमे आणि वेब सीरीज सोबत नेटफ्लिक्स चाहत्यांचं मनोरंजन करणार आहे. जाणून घेऊयात त्या आगामी प्रोजेक्ट्सची यादी.

1) गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल
2) रात अकेली है
3) डॉली किट्टी और वो चमकते सितारे
4) तारेबाज
5) AK vs AK
6) गिन्नी वेड्स सनी
7) त्रिभंगा- टेढी, मेढी, क्रेजी
8) लूडो
9) क्लास ऑफ 83
10) अ सूटेबल बॉय
11) मिसमॅच
12) सीरियस मेन
13) काली खुही
14) बॉम्बे रोज
15) भाग बीनी भाग
16) बॉम्बे गेम्स
17) मसाबा मसाबा