Netflix ने मोबाइल युजर्ससाठी आणला १९९चा प्लॅन, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेटफ्लिक्स हे वेबचॅनल सध्या फार गाजत आहे. नेटफ्लिक्सवरील चित्रपट आणि सिरीजही सर्वांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे त्याचे युजर्स अधिक संख्येत आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या युझर्ससाठी बुधवारी स्वस्तात मस्त प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन फक्त भारतीय युजर्ससाठी असणार आहे. या प्लॅनचे नाव गो मोबाइल असे नाव आसून फक्त १९९ रुपयांचा हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना फक्त एसडी क्वालिटीमध्ये व्हीडिओ पाहता येणार आहेत.

नेटफ्लिक्सने आणलेला हा प्लॅन १९९ रुपयांना ठेवला आहे. या प्लॅननुसार युजर्सना ४८०p वर फक्त SD कंटेंटचा सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना HD, ७२०p नाहीतर यापेक्षा अधिक रिझोल्यूशनवरील म्हणजे क्वालीटीचा कंटेंट दिसणार नाही. तसंच हा प्लॅ फक्त एकच व्यक्ती वापरू शकते. १९९ रुपयांचा हा प्लॅन एक महिन्यासाठी असून तो फक्त मोबाइलधारकांना वापरता येणार आहे.

नेटफ्लिक्सने मागील काही दिवसांत भारतातील सर्व प्लॅनचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांनी हा स्वस्त आणि मस्त प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. तसंच सध्या २५० रुपयांच्या प्लॅनची टेस्टींग सुरु आहे, ती जर यशस्वी आणि फायदेशीर वाटली तर लवकरच २५० रुपयांचा प्लॅनही बाजारात येऊ शकतो.

दरम्यान, भारतात नेटफ्लिक्सचे चाहते भरपूर आहेत. त्यामुळे त्याची मागणीही जोरदार आहे. मात्र त्याचे प्लॅन हे महाग असल्याने अनेक जण मिळून हे एक प्लॅन घ्यायचे. भारतात चाहते अधिक असूनही सबस्क्रिप्शनची संख्या कमी होती. त्यामुळे भारतातील नेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शनची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नेटफ्लिक्सने आपल्या दरात कमतरता आणली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –