खुशखबर ! Netflix चे प्लान झाले स्वस्त ! 149 रुपयांपासून पॅकची सुरुवात, मासिक प्लान्सवर 60% पर्यंत केली ‘कपात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेटफ्लिक्स (Netflix) ने भारतात आपल्या प्लान्ससाठी नवीन आणि कमी किंमतींची घोषणा केली आहे. मोबाईल-ओन्ली प्लान (Mobile only Plan) अंतर्गत 199 रुपये प्रति महिना ऐवजी 149 रुपये प्रति महिनापासून सुरू होत आहे. नवीन प्लान सर्व ग्राहकांसाठी लागू होतील. हे पाऊल देशात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सच्या प्रयत्नांचा भाग आहे. कारण ही देशातील सर्वात महाग स्ट्रीमिंग सेवा आहे. (Netflix)

 

नवीन प्राईसच्या अंतर्गत नेटफ्लिक्सच्या (Netflix) बेसिक प्लानची किंमत आता 199 रुपये प्रति महिना असेल. अगोदर या प्लानची किंमत 499 रुपये प्रति महिना होती. या हिशेबाने याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. स्टँडर्ड नेटफ्लिक्स प्लानची किंमत आता 499 रुपये प्रति महिना होईल, तर अगोदरची किंमत 649 रुपये होती.

 

सर्वात महाग नेटफ्लिक्स प्लान जो प्रीमियम प्लान आहे, आता याची किंमत 649 रुपये प्रति महिना होईल. अगोदर या प्लानची किंमत 799 रुपये प्रति महिना होती. नवीन प्लान्सबाबत लक्षात ठेवण्यासाठी इतर डिटेल्स येथे दिल्या आहेत.

 

नेटफ्लिक्सच्या प्लान्सच्या दरात बदल 14 डिसेंबरपासून झाला आहे. सर्व सदस्यांसाठी तो पुढील बिलिंग सायकलपासून लागू होईल. नवीन सदस्य केवळ नेटफ्लिक्ससाठी साईन करू शकतात आणि नवीन किमतीवर स्कीमची निवड करू शकतात.

 

मोबाईल, बेसिक किंवा स्टँडर्ड प्लानवर नेटफ्लिक्सच्या सदस्यांसाठी, कंपनी त्यांना त्या प्लानमध्ये अपग्रेड करेल जो सध्याच्या प्लानपेक्षा एक टियर जास्त आहे. असे त्याच मासिक किंमतीत केले जाईल, जी तुम्ही आज नेटफ्लिक्ससाठी भरत आहात. म्हणजे मोबाईल प्लान यूजर्स 199 रुपये प्रति महिनावर बेसिक प्लानमध्ये अपग्रेड होतील.

 

प्लानच्या किंमतीत 18 ते 60 टक्के कपात
यूजर्सला त्यांच्या डिव्हाईसवर एक माहिती मिळेल, जिथे ते प्लानचा वापर करण्यासाठी ‘अपग्रेडला दुजोरा द्या’ पर्याय निवडू शकतात किंवा आपल्या इच्छेनुसार, इतर योजना निवडू शकतात. एकुण मिळून वेगवेगळ्या प्लानमध्ये किंमतीमध्ये 18 ते 60 टक्के कपात केली आहे.

– 149 रुपयांचा मोबाइल प्लान
नेटफ्लिक्स मोबाइल प्लान आता 149 रुपये प्रति महिन्यापासून सुरू होतो.
मोबाईल प्लान 480 रिझोल्युशनसह मोबाईल किंवा टॅबलेटला सपोर्ट करतो.
या प्लानसोबत तुम्ही नेटफ्लिक्स टीव्ही किंवा कम्प्युटरवर अ‍ॅक्सेस करू शकत नाही. अकाऊंट एकावेळी एकाच डिव्हाईसद्वारे अ‍ॅक्सेस करू शकता.

 

– 199 रुपयांचा बेसिक प्लान
199 रुपये प्रति महिन्याचा बेसिक स्कीम सुद्धा रिझोल्युशन 480 पी पर्यंत मर्यादित करेल,
परंतु तुम्ही खाते कम्प्युटर आणि टीव्हीवर सुद्धा अ‍ॅक्सेस करू शकता. परंतु डिव्हाईस लिमिट एकच राहते.

 

– 499 रुपयांचा स्टँडर्ड प्लान
नेटफ्लिक्सच्या स्टँडर्ड प्लानची किंमत आता 499 रुपये प्रति महिना आहे आणि हा एकावेळी दोन डिव्हाईससाठी सपोर्टसह येतो.
यामध्ये 1080 पी रिझोल्यूशन आहे. खाते मोबाइल, टीव्ही, कम्प्युटर आणि टॅबलेटवर अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते. (Netflix)

 

– 649 रुपयांचा प्रीमियम प्लान
प्रीमियम नेटफ्लिक्स खात्याची किंमत आता प्रति महिना 649 रुपये आहे.
हे 4के रिझोल्यूशनसह येते आणि एकाच वेळी चा डिव्हाईसवरून अ‍ॅप पर्यंत पोहचण्याची क्षमता आहे.
विशेष म्हणजे कंटेंट सर्व चार डिव्हाईसवर पाहता येतो, ज्यामध्ये मोबाईल, टॅबलेट, कम्प्युटर आणि टीव्ही आहे.

 

Web Title :- Netflix | netflix cuts price for plans in india mobile only plan now starts at rs 149 know full details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

अवघे 37 हजार देऊन घरी आणा जास्त मायलेजची Maruti Alto 800, केवळ इतका होईल EMI

Parineeti Chopra | परिणीती चोप्राने परिधान केला इतका टाईट ड्रेस की अचानक मागून फाटला अन्…

Pune Rural Police | पुणे जिल्ह्यात माळेगाव, उरुळी कांचन, निरा-नृसिंहपुर नवी पोलीस स्टेशनची निर्मिती ! ‘दौंड’चे विभाजन करुन शिरुर उपविभागीय कार्यालय अस्तित्वात येणार