‘या’ दिवशी येतोय ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजने संपूर्ण भारताला वेड लावलं होतं. या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीजनची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. नेटफ्लिक्स इंडियाने यासंदर्भात आजच एक ट्विट केले आहे. नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कॅलेंडर निकाल, तारीख लिख ले, १४ दिन में कुछ बडा होनेवाला है” नेटफ्लिक्सच्या या ट्वटवरून लोकांनी अंदाज लावला आहे की सेक्रेड गेम्सचा सीजन २ लवकरच येणार आहे.

नेटफ्लिक्सच्या या ट्विटनंतर सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांनी अदांज व्यक्त केला आहे की, १४ दिवसांनी सेक्रेड गेम्स या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाचा टिझर किंवा ट्रेलर प्रदर्शित केला जाऊ शकतो. नेटफ्लिक्सच्या ट्विटनुसार १४ दिवसांत काहीतरी होणार आहे. कदाचित सीजन २ प्रदर्शित केला जाऊ शकतो असा अंदाजही वर्तवला जाऊ शकतो.

पच्चीस दिन है तुम्हारे पास !

सेक्रेड गेम्समध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफअली खान हे दोघे प्रमुक भूमिकेत आहेत. नवाजने यात गणेश गायतोंडेची भूमिका साकारली आहे तर सैफअली खानने सरताज सिंगची भूमिका साकारली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकरलेला गणेश गायतोंडे पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. पहिल्या सीजनमध्ये गणेश गायतोंडेने सरताजला सांगितले होते की, “पच्चीस दिन में सब मर जायेंगे, बस त्रिवेदी बचेगा.” त्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये त्रिवेदी हे पात्र आपल्याला प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसेच पंकज त्रिपाठीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी सेक्रेड गेम्स ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. ऑगस्ट 2018 मध्ये ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. सेक्रेड गेम्स या वेबसिरीजने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. संपूर्ण भारताला या वेबसिरीजने वेड लावलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us