IPL 2021 : फिरकीपट्टू हरप्रीत ब्रार आणि पॉर्न स्टार यांच्यातील नेटिझन्सनी पकडलं ‘कनेक्शन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या वेळी समाज माध्यमावर मिम्सच्या माध्यमातून पावसाचा जसा वर्षाव पडतो तसा मिम्सचा पडतो. तर जेव्हा कोणता क्रिकेट प्लेअर प्रसिद्धीस येतो त्याच प्रमाणे नेटिझन्स कोणावर तरी मिम्सच्या साह्याने धुडकुस घालत असतात. यावरून या वर्षीच्या सुरु असणाऱ्या आयपीएलच्या सामन्यादरम्यान हे दिसत आहे. तर पंजाब किंग्स (PBKS) संघाचा फिरकीपटू हरप्रीत ब्रारने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध (RCB) एकहाती सामना फिरवताना अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु, आता हाच हरप्रीत नेटिझन्सच्या रडारवर आला आहे. तर ते एका पॉर्न स्टारला मेसेज केल्यामुळे झालं आहे.

कधीतरी सामन्यात कोणता तरी खेळाडू चमकतो पण तितक्यात तो नेटीझनच्या जाळ्यात येतो. याचप्रमाणे फिरकीपटू हरप्रीतही आता अशाच जाळ्यात अडकला आहे. त्यामुळेच नेटिझन्स हरप्रीतला अधिक जबरदस्त ट्रोल करताना पाहायला मिळत आहे. तर, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांना ७ चेंडूंमध्ये बाद करत सर्वांच्या चर्चेत आलेल्या हरप्रीतचे जुने ट्वीट नेटिझन्सच्या हाती लागले आणि ते जबरदस्त प्रसारित सुद्धा झाले आहे.

या प्रक्रावरून या ट्वीटची इतकी चर्चा होत आहे ते पॉर्न स्टार मिया खलिफामुळे. हरप्रीतने या ट्वीटमध्ये मियाला १४ फेब्रुवारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणूनच आता नेटिझन्स सवाल करत आहेत की, या २ ‘स्टार्स’मध्ये काही कनेक्शन आहे का? त्याचवेळी, अनेकांनी या ट्वीटवर मीम्सही तयार केले असून फिरकीपट्टू हरप्रीतला अधिक जबरदस्त ट्रोलही करण्यात येत आहे. IPL च्या २६ व्या सामन्यामध्ये पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ३४ धावांनी नमवले होते. या सामन्यामध्येच फिरकीपट्टू हरप्रीतने ३ दिग्गज खेळाडूंना बाद करत पंजाबच्या विजयात अधिक जबरदस्त कामगिरी केली होती. या कामगिरीवरून हरप्रीतचे सर्वतोपरी कौतुक देखील केले जात होते.