अभिनेत्री शबाना आझमींच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या ‘त्या’ जवानाला नेटकर्‍यांकडून कडक ‘सॅल्यूट’

मुंबई : पोलीसनामा वृत्तसंस्था – चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा शनिवारी दुपारी गंभीर अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात त्याचा कार चालक आणि त्या जखमी झाल्या आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते आहे. दरम्यान, या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. ज्यात, शबाना यांना उचलण्यासाठी धडपड करणाऱ्या सैन्यातील एका जवानाचेही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

त्यामुळे, या जवानाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. शबाना यांना अपघातावेळी या जवानाने केलेल्या मदतीमुळे त्याचे कौतुक केले जात आहे. या जवानाचे फोटो व्हायरल करत त्यांस कडक सॅल्युट करण्यात येत आहे. तसेच शबाना यांच्या मदतीसाठी अखेर भारतीय जवान पुढे आला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. शबाना यांनी अनेकदा सरकारविरोधात आपली मत व्यक्त केली. मात्र, सैन्याबद्दल कधीही आक्षेपार्ह बोलल्या नाहीत. तरीही, जवानच त्यांच्या मदतीला आला, असे म्हणत शबाना यांच्यावर पोस्ट करण्यात येत असून या जवानाचं कौतुकही केलं जात आहे.

दरम्यान, शबाना आझमींचे पती जावेद अख्तर अपघातावेळी याच गाडीतून प्रवास करत होते, मात्र, त्यांना साधे खरचटलेही नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु प्रत्यक्षात जावेद अख्तर अपघात झालेल्या कारमध्ये नव्हतेच. ते दुसऱ्या कारमधून प्रवास करत होते. त्यामुळे ते या अपघातातून बचावले. दरम्यान, अपघातावेळी जावेद अख्तर आणि स्थानिकांबरोबर सैन्यातील एक जवान शबाना यांच्या मदतीसाठी पुढे आले. अपघातझाल्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत या जवानाने मदत केली.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like