‘सिद्धूसोबत काम करणं बंद कर अन्यथा..’ : नेटकऱ्यांचा कपिलला इशारा

मुंबई : पोलीसनाम ऑनलाईन- ‘दशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढवा’ असं वक्तव्य माझी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जनतेचा त्यांच्यावरील संपात उफाळून आला आहे. यानंतर नेटकऱ्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या आहेत. सिद्धूच्या यांच्या या विधानावरून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कॉमेडिअन कपिल शर्माला इशारा दिला आहे. सिद्धूसोबत काम करणं बंद कर नाहीतर तुझा शो पाहणं बंद करू अशा इशारा संतापलेल्या नेटकऱ्यांनी कपिलला दिला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. कपिलनं पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अशी नेटकऱ्यांची इच्छा आहे. शिवाय त्याने जर त्यांच्यासोबत काम करणं थांबवलं नाही तर त्याचा शो पाहणं बंद करण्याचा इशारा नेटकऱ्यांनी दिला आहे.

दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो असे म्हणत नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानची पाठराखण केली. याशिवाय फक्त चर्चेने पाकिस्तानसोबत असलेले संबंध सुधारले जातील असं विधानही त्यांनी केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, “या हल्ल्याचा निषेध आहे. हा भ्याड हल्ला आहे. चर्चेतून यावर कायमचा तोडगा काढला पाहिजे. कुठपर्यंत जवानांनी बलिदान द्यायचं ? कधीपर्यंत हा रक्तपात सुरु राहणार आहे ? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. एकमेकांवर आरोप करुन काही फायदा होणार नाही.”

दरम्यान, या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असताना कपिलनंदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. शिवाय या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यानं श्रद्धांजली वाहिली तर जखमींच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यानं प्रार्थना केली आहे. परंतु जोपर्यंत कपिल नवज्योत सिंग सिद्धूसोबत काम करणं बंद करत नाही तोपर्यंत कपिल आणि वाहिनीला बहिष्कृत केलं जाईल असा इशाराही नेटकऱ्यांनी दिला आहे.

Loading...
You might also like