#BoycottBB14 : बिग बॉस 14 बॅन करण्याची मागणी, यूजर्सने सलमान खानचा ‘शो’ला ‘वल्गर असल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बिग बॉस (bigg boss 14) शो हा वादांमुळे सुद्धा ओळखला जातो. अनेकदा दिसून आले आहे की, जेव्हा शोच्या विरूद्ध सोशल मीडियावर लिहिले जाते. असेच काहीसे पुन्हा एकदा दिसत आहे. यूजर्सने बिग बॉस ( bigg boss 14) 14 बॅन करण्याची मागणी केली आहे. जाणून घेवूयात याचे कारण.

बिग बॉस बॅन करण्याची मागणी
अपकमिंग एपिसोडचा एक प्रोमो समोर आला होता. ज्यामध्ये बिग बॉसने मुलींना इम्यूनिटी मिळवण्याची संधी दिली. या अंतर्गत मुलींना सिद्धार्थ शुक्लाला आपल्या अदा आणि नजाकतीने इम्प्रेस करायचे होते. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, पवित्रा पुनिया, रुबीना दिलैक, जस्मिन भसीन, निक्की तांबोळी बाइकवर बसलेल्या सिद्धार्थ शुक्लासोबत रेन डान्स करत आहेत.

हा प्रोमो असा तर खुप मजेशीर आहे, परंतु अनेक लोकांनी यावर आक्षेप नोंदवत, शो वल्गर आणि चीप असल्याचे म्हटले आहे. ट्रोल्स बिग बॉस 14 ला बॅन करण्याची सुद्धा मागणी करत आहेत. #BoycottBB14 ट्रेंड करत आहे. एका यूजरने लिहिले – वेळ आली आहे की, बिग बॉस बॅन करण्यात यावे. मागच्या सीझनमध्ये हिंसेला प्रमोट करण्यात आले होते आणि यावेळी वल्गॅरिटीला.

यूजर्सचे म्हणणे आहे की, टास्कच्या नावावर वल्गॅरिटी सहन केली जाणार नाही. हे सुद्धा म्हटले आहे की, एंटरटेन करण्याचे दुसरे सुद्धा मार्ग आहेत. हा टास्क एंटरटेनिंग नव्हे, चीप वाटला. बिग बॉसला लाज वाटण्याबाबत सुद्धा म्हटले गेले आहे. मागील दोन सीझन्सपासून सतत अशी मागणी होताना दिसत आहे. कधी शोमध्ये कंटेस्टंटच्या रोमान्सवर, तर कधी हिंसेवर यूजर्सने शो बॅन करण्याची मागणी केली आहे. परंतु एक दुसरा वर्गसुद्धा आहे, ज्यास बिग बॉसच्या कंटेटवर आक्षेप नाही, त्यांना शो एंटरटेन करतो.