मुलीच्या ‘त्या’ फोटोमुळे ए. आर. रहमान होत आहे ट्रोल

मुंबई : वृत्तसंस्था – ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉलिवुडच्या अनेक दिग्गजांची हजेरी होती. या कार्यक्रमातला एक फोटो संगीतकार ए. आर. रहमानने त्याच्या अधिकृत ट्विटर वरून शेअर केला होता. या फोटोमुळे रहमान सोशल मीडियावर सध्या चांगलाच ट्रोल होत आहे.

हा फोटो शेअर करत रेहमानने लिहिले, निता अंबानी यांच्यासोबत माझ्या कुटुंबातील महिला खतिजा, रहीमा आणि सायरा या फोटोला #freedomtochoose असा हॅशटॅगही त्याने पोस्ट केला होता. पण या फोटोमुळेच त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

त्याने शेअर केलेल्या या फोटोत त्याची मुलगी खतिजाने बुरखा परिधान केल्याचे दिसून येत आहे. हा फोटो पाहून रहमानला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करत बुरख्यात कसलं आलं आहे स्वातंत्र्य ? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. एवढेच नाही तर काही जणांनी चेहराच दाखवायचा नव्हता तर फोटो काढला कशाला ? असाही प्रश्न विचारला आहे.