सोमन कपूर, तू पाकिस्तानमध्येच जा ना मग !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर सोनम कपूरने केेलेल्या वक्तव्यानंतर आता नेटीझन्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. देशभरात कलम ३७० रद्द करण्यात आल्याने या निर्णयाचे समर्थन केले जात असताना सोनम कपूरने एक प्रतिक्रिया दिल्याने तिला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी तिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे. जम्मू काश्मीरबाबत सध्याची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे, परंतू मी खूप देश भक्त आहे. या तिच्या काश्मीरसंबंधित प्रतिक्रियेने अनेक नेटिझनसने तिला ट्रोल केले.

मुलाखतीत सोनम म्हणाली की, माझ्यासाठी सध्या शांत राहणेच योग्य आहे. कारण हा काळ देखील लवकरच निघून झाली. आपला देश ७० वर्षापूर्वी एकसंध होता. परंतू आताचे विभाजनशील राजकारण पाहता मन हेलावून जाते. सध्याचे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे असून मला यातील फारसे माहित नाही. कारण सध्या एवढ्या विरोधी बातम्या आहेत की सत्य काय हे मला कळतच नाही. सध्याच्या परिस्थितीत शांत राहणे आणि काय घडतंय ते पाहणे यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा याबद्दल मला पूर्ण माहिती मिळेल तेव्हाच मी यावर मत मांडू शकेल.

कुटूंबाचे नाते पाकिस्तानशी कसे जोडले जाते यावर विचारल्यावर ती म्हणाली की मी सिंधी असन्याबरोबरच पेशावरी देखील आहे. सोनमने केलेल्या या विधानांमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like