‘भाईजान’ सलमानचा भाऊ सोहेलनं पळून जाऊन केलं होतं सीमा सोबत लग्न ! आता दोघंही राहतात वेगळं ?

पोलीसनामा ऑनलाइन – नेटफ्लिक्स (Netflix) नं काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींना घेऊन एक वेब रिअ‍ॅलिटी शोचा ट्रेलर रिलीज केला होता. Fabulous Lives of Bollywood Wives असं या शोचं नाव होतं. निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांचा हा शो आहे. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी आणि अ‍ॅक्ट्रेस नीलम कोठारी सोनी दिसणार आहेत. शोमध्ये या चौघींच्या आयुष्याची झलक दाखवण्यात आली आहे. या सीरिजमधील सीमा खानची कहाणी चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे की, सीमा (Seema Sachdev Khan) आणि सोहेल (Sohail Khan) दोघंही वेगळ्या घरात राहतात. सीमा म्हणते, सोहेल घरी येत जात असतो. त्यांचा मोठा मुलगा निर्वाणही सोहेल सोबत राहतो. दोघांना वेगळं राहताना पाहून अनेक यूजर्संनी यावरून सवाल उपस्थित केले आहेत. ते आता वेगळं राहात आहेत का, असा सवाल अनेकांनी केला आहे.

पळून जाऊन केलं होतं लग्न

सीमा मूळची दिल्लीची असून, फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली होती. याचदरम्यान सीमा आणि सोहेल यांची पहिली भेट झाली होती. सोहेल पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडला होता. नंतर दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. जेव्हा दोघांना लग्न करायचं होतं तेव्हा सीमाच्या घरचे लोक अजिबात यासाठी तयार नव्हते.

ज्या दिवशी सोहेलाच प्यार किया तो डरना क्या हा सिनेमा रिलीज होणार होत्या, त्याच दिवशी सीमा आणि सोहेल घरातून पळून गेले. दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. नंतर दोघांच्या घरवाल्यांनी हे नातं स्वीकारलं. या कपलनं नंतर निकाहदेखील केला होता. आता दोघांना 2 मुलंही आहे. निर्वाण आणि योहान अशी त्यांची नावं आहेत.

फॅशन डिझायनर आहे सीमा

लग्न झाल्यानंतर सीमा आणि सोहेल यांनी एंटरटेन्मेंट बिजनेस सुरू केला. बघता बघता सीमा टीव्ही आणि सिनेमातील लिडिंग फॅशन डिझायनर झाली. जस्सी जैसी कोई नही या मालिकेचे कॉस्ट्युम हे सीमानं डिझाईन केलं होते. या मालिकेतून तिला ओळख मिळाली. वांद्र्यात सीमचं 190 नावाचं बुटीक आहे. सुझैन खान आणि महीप कपूर सोबत मिळून ती हे बुटीक चालवते. मुंबईतदेखील सीमाचं ब्यूटी स्पा आणि कलिस्ता नावाचं सलूनदेखील आहे.

You might also like