Never Drink Tea After Eating Lemon And Gram Flour Food | ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यानंतर चहा अजिबात घेऊ नका; अन्यथा होईल नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Never Drink Tea After Eating Lemon And Gram Flour Food | बहुतांश लोक चहा (Tea) पितात. सकाळी उठल्या उठल्या अनेकांना चहाची सवय असते. चहा नाही मिळाल्यास अनेकांचा मुड देखील तितकाच खराब होतो. चहा पिल्याने दिवसभर आनंदी वातावरण राहतं. त्याचबरोबर मुड देखील फ्रेश राहतो असं अनेकजण म्हणतात. महत्वाचे म्हणजे चुकीच्या पद्धतीने चहा पिल्यास आपल्या आरोग्याला नुकसान देखील करते. असं असलं तरीही लोक चहा सोडत नाहीत. असे काही पदार्थ आहेत की ज्याचे सेवन केल्यानंतर चहा पिणे हानिकारक असतं. त्यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता. याबाबत सविस्तर माहिती (Health Tips) जाणून घ्या. (Never Drink Tea After Eating Lemon And Gram Flour Food)

 

1. थंड गोष्टी (Cool Things) –
खूप जास्त थंड पदार्थ (Cold Foods) खाल्ल्यानंतर चूकूनही चहा पिऊ नये. असं केल्यास पचन तंत्रावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी काहीही थंड पदार्थ खाल्ल्यानंतर अर्धातास थांबून चहा प्यायला पाहिजे.

 

2. लिंबू (Lemon) –
ज्या पदार्थांमध्ये लिंबाचं प्रमाण आहे अशा पदार्थांच्या सेवनानंतर तातडीने चहा पिऊ नये. काही लोकं वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू घालून पितात आणि त्यानंतर तातडीने चहा पितात. असं केल्यास पोटफुगी, एसिडीटी (Acidity) असे त्रास उद्भवू शकतात.

 

3. बेसनाचे पदार्थ (Gram Flour Food) –
बेसना पासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर चहा पिऊ नये. बेसनापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास पचनसंस्थेशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय बेसना पासून बनवलेले पकोडे (Pakode) चहा सोबत खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Never Drink Tea After Eating Lemon And Gram Flour Food

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Piles Causing Foods | मुळव्याधीच्या त्रासाने त्रस्त असाल तर ‘या’ 4 गोष्टी अजिबात खाऊ नका, जाणून घ्या

 

Side Effects Previously Used Oil | कढईमध्ये उरलेल्या तेलाचा वारंवार वापर करताय?; मग थांबा, अन्यथा होईल दुष्परिणाम

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना