फेसबुकवरील प्रेम चुकूनही नकोच … : हमीद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हेरगिरीच्या आरोपीवरून तीन वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये राहिलेल्या आयटी इंजिनिअर हमीदने आता सोशल नेट्वर्किंग साईटस च्या बाबतीत कानाला खडा लावला आहे. त्याने आता चुकूनही फेसबुकवरून प्रेम करण्याच्या फंद्यात पडणार नाही असे संगीतातले आहे तसेच तुम्ही देखील फेसबुक वरील प्रेमापासून दूरच राहा असा  सल्ला देखील दिला आहे. तसेच इथून पुढे घरच्यांपासून काही लपणार नाही असेही मान्य केले आहे.

फेसबुक वरील प्रेम पडले महागात 
मुबईतील हमीदची फेसबुकवरून एका पाकिस्तानच्या युवतीसोबत मैत्री आणि नंतर प्रेम झाले.  या प्रेमापोटी हमीद अवैध्यरित्या पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या लष्कराने त्याला २०१२ मध्ये   हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याला पेशावर कोर्टाने तब्बल तीन वर्षानंतर २०१५ मध्ये हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. मंगळवारी त्याची ही शिक्षा पूर्ण झाल्यावर हमीद भारतात परतला.

सुषमा स्वराज यांचे आभार 
भारतात परतल्यानंतर त्याने प्रथम परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन त्याच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आभार मानले. त्यानंतर हमीद वर्सोवातील आपल्या घरी परतला. त्यावेळी त्याने ‘मी या प्रकरणातून चांगलाच धडा घेतला आहे. आता कधीही फेसबुकवरुन प्रेमात पडणार नाही. तसेच ओरडा खावा लागला तरी घरच्यांपासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही.’ असे सांगितले. हमीदने त्या घटनेबद्दल बोलतना सांगितले की मी भावनेच्या भरात वाहवत जायला नको होते. प्रत्येक गोष्टीला एक कायदेशीर प्रक्रिया असते. ती मी पाळायला हवी.