सरकारी स्कीमसह Google वर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही सर्च करू नका, अन्यथा….
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज काल गूगलवर सगळ्या गोष्टींची माहिती मिळत असते. पण अशा पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही गूगलवर सर्च न करणे तुमच्याच फायद्याचे असणार आहे. नाहीतर तुम्हाला याचा फटका बसू शकतो. जर आपल्याला कोणत्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर आपण कोणताही विचार न करता सरळ ती गूगलवर सर्च करत असतो. त्या गोष्टींची माहिती काही सेकंदात आपल्याला मिळते. पण आज आपण या गोष्टी बघणार आहेत ज्या तुम्ही कधीहि गूगलवर सर्च करू नका. जाणून घ्या त्या गोष्टींबद्दल
१ ) बँक अकाउंट
जर तुम्ही ऑनलाइन बँकिंग वापरात असाल तर या यासंबंधीची कोणतीही माहिती चुकूनसुद्धा गूगलवर शोधू नका. सध्या बँकिंग फ्रॉडच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार आपल्या प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवून असतात. हे गुन्हेगार बँकेसारखीच दिसणारी हुबेहूब वेबसाईट बनवतात. आपण जर त्या वेबसाईटवर क्लीक केले तर तुमचा बँकिंग डेटा चोरला जाऊ शकतो तर आणि त्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
२) कस्टमर केअर
कोणत्याही कस्टमर केअरचा नंबर गुगलवर चुकूनसुद्धा सर्च करू नका. सायबर हॅकर्स या ठिकाणी चुकीचा कस्टमर केअर नंबर देऊन तुमचा डेटा चोरू शकतात. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फटका सुद्धा बसू शकतो.
३) अॅप्स किंवा सॉफ्टवेअर
मोबाइल अॅप्स आणि सॉफ्टवेअर मुळे तुमची कामे कमी वेळात पटकन होऊन जातात. त्यामुळे तुमचा खूप टाइमसुद्धा वाचतो. काही वेळा हॅकर्स अगदी त्या अॅप्स आणि सॉफ्टवेयर सारखे हुबेहूब अॅप्स गूगलवर टाकत असतात. ते जर तुम्ही डाउनलोड केले तर तुमची पर्सनल माहिती त्यांनी मिळू शकते. तसेच या अॅप्समुळे तुमच्या मोबाईल किंवा कंप्यूटरमध्ये वायरस येऊ शकतो.
४) सरकारी स्कीम
सरकारी स्कीमसंबंधी अनेक लोकांना माहित नसते. तेव्हा लोक यांची माहिती गूगलवर शोधात असतात. याचा फायदा सायबर हॅकर्स घेतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होण्याची वेळ येईल. ती येऊ नये म्हणून तुम्ही अधिकृत साइट्स वर जाऊन सरकारी स्कीमची माहिती घ्या.
५) कूपन कोड
ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हाला अनेकदा कूपन कोड द्वारे डिस्काउंट देण्यात येते. काही लोक डिस्काउंट मिळवण्यासाठी फ्री कूपन कोडसाठी गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करतात. एक्स्पर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, हे असे कूपन कोड गुगलवर शोधणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. यामुळे तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूकसुद्धा होऊ शकते. त्यामुळे असे कूपन कोड गूगलवर सर्च करणे टाळावे.