सत्तेचा ‘माज’ करू नका, जनता जागा दाखवते : मोहन भागवत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी पार पडला. त्यावेळी संघाचे सरसंचालक मोहन भागवत काय म्हणतात यावर सर्वांचे लक्ष लागले होते. समारोप कार्यक्रमातील भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांना सल्ला दिला. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकाही केली. आणि इतर पक्षांना अप्रत्यक्षपणे इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोक हे अतिशय शहाणे आहेत. त्यांना कोण काय करतं हे कळतं. जे सत्तेचा माज करतात त्यांना लोक नाकारतात हे पश्चिम बंगालमध्ये दिसून आलं. राजकीय पक्षांना निवडणूका लढवाव्या लागतात पण स्पर्धा असल्यामुळे वातवरणही ढवळून निघत. निवडणुकीनंतर सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

पश्चिम बंगाल मध्ये काय सुरु आहे असे कुठे झाले आहे काय ? अशा परिस्थितीत शासन प्रशासनाने कारवाई करावी केली पाहिजे. सत्तेचा उपभोग करून लोकशाहीची थट्टा केली, सत्तेचा माज दाखवला तर सामान्य जनता अशा नेत्यांना धडा शिकवतेच, असं भागवत यांनी सांगितलं.

तसंच मोदी सरकारबद्दल बोलताना, पुन्हा सत्तेत आलेल्या पक्षाकडून लोकांना काही अपेक्षा होत्या काही पुर्ण झाल्या काही व्हायच्या आहेत. पुन्हा सत्तेत आलेल्या पक्षाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या पुर्ण कराव्या लागतील. स्वार्थ आणि भेदभाव सोडून यावेळेस देशातील मतदारांनी मतदान केलं. निवडणूक प्रचारात काही पक्षांनी ढकोसला मतदारांपुढे सादर केला होते पण तो मतदारांनी नाकारला. निवडणुकीचा शिमगा संपला तरी कवित्व संपले नाही, असं त्यांनी म्हटलं.