मी कधीही इंद्राणी आणि पीटर मुखर्जीला भेटलो नाही : कार्ती चिदंबरम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. चिदंबरम यांच्या अटकेनंतर पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि खासदार कार्ती चिदंबरम त्यांची बाजू मांडण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आपण कधीही इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीला भेटलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी संवाद साधताना कार्ती म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाची आणि पी चिंदंबरम यांची प्रतिमा मलिन करण्याचा सरकारचा डाव आहे. माझ्या वडिलांनाच नाही तर संपूर्ण कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले जात आहे. जंतर-मंतरवर मी याचा निषेध करेन. इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांना मी आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही भेटलेलो नाही. मी एकदाच इंद्राणी मुखर्जीला बघितले आहे. ज्यावेळी सीबीआय मला तिच्यासमोर घेऊन गेली होती. मी तिच्याशी किंवा तिच्या कंपनीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क केलेला नाही.’

चिदंबरम यांना अटक झाल्यानंतर काँग्रेस संतापली आहे. सरकार सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांना अडकविण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. चिदंबरम यांच्या याचिकेवर गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पिठासमोर सुनावणी होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –