नुकसान टाळायचे आहे का ? तर ‘या’ 8 गोष्टी Google वर कधीही सर्च करू नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल आपल्या रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी सोप्या करते, एक बटन दाबताच सर्व माहिती मिळते. जर हे आपल्या फायद्यासाठी आहे तर याचे काही तोटे सुद्धा आहेत. गुगलवर सध्या प्रत्येक माहिती आहे आणि याचाच फायदा घेऊन काही फेक वेबसाइट्स ऑनलाइन फसवणूक करत आहेत. अशाप्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करायचा असेल आणि आपला डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर चुकूनही या गोष्टी ऑनलाइन सर्च करू नका.

बँक ऑनलाइन सर्च करू नका
काही फेक वेबसाइट्स आपले नाव बँकांच्या नावावर ठेवतात, आपण बँकेचे नाव सर्च करताच, त्यांच्या जाळ्यात अडकू शकता. यासाठी Google वर URLs सर्च करा.

औषध ऑनलाइन सर्च करणे टाळा
प्रकृती बिघडली, काही आजार असेल तर काही डॉक्टरकडे जाण्याएवजी लोक गुगल सर्च करून औषध सर्च करतात. परंतु, अशा चुकीमुळे तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. गुगल तुमच्या जीवनातून डॉक्टरला हटवू शकत नाही. गुगलवरील औषधे प्रतिबंधित असू शकतात. ज्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.

ऑनलाइन शॉपिंग करणे टाळा
ऑनलाइन शॉपिंग करणे तुम्हाला नुकसानकारक ठरू शकते. अनेक कंपन्या विविध अमिष दाखवून ब्रँडेड कपड्यांच्या नावाने नकली कपडे विकतात. अनेक ग्राहक गुगलवर कुपन्स सर्च करतात, ज्यामुळे सूट मिळते. परंतु, त्या कुपनवर क्लिक केल्याने तुमचा पर्सनल डेटा चोरी होऊ शकतो. बँकिंगसंबंधी फसवणूक होऊ शकते. यासाठी चांगल्या ई-कॉमर्स कंपनीचीकडूनच ऑनलाइन शॉपिंग करा.

कस्टमर केयर नंबर सर्च करू नका
ऑनलाइन कस्टमर केयरचा नंबर सर्च करणे खुप धोकादायक ठरू शकते. सायबर गुन्हेगार याचीच वाट पहात असतात. सायबर गुन्हेगार नकली साइट बनवून नकली नंबर आणि नकली ईमेल आयडी टाकून ठेवतात आणि तुम्ही त्यामध्ये फसता.

ऑनलाइन फाईल्स आणि अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका
अनेक अ‍ॅप्स गुगल प्लेस्टोरवर मिळत नाहीत. कारण ते सेफ नसतात. काही लोक हे अ‍ॅप्स एखाद्या अनोळखी वेबसाइटवरून डाऊनलोड करतात. यामुळे पर्सनल डेटासुद्धा चोरी होऊ शकतो. ऑफिशियल साइट्स किंवा फोनमध्ये उपलब्ध अ‍ॅप स्टोरमधूनच डाऊनलोड करा.

स्टॉक मार्केट किंवा गुंतवणुकीशी संबंधी सल्ला घेणे टाळा
स्टॉक मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट हाय रिस्कची सेक्टर आहेत, यासाठी गुगलची मदत घेणे टाळा. गुगलमध्ये सर्च केल्यानंतर एखाद्या कंपनीचे शेयर खरेदी करणे मूर्खपणाचे ठरू शकते. यासाठी जाणकारांचा सल्ला घ्या.

सरकारी वेबसाइट्स शोधणे टाळा
कोणत्याही सरकारी वेबसाइटसाठी गुगल सर्च करू नका, तर तिचा युआरएल टाकून साइटवर जा. सरकारी साईट गुगल सर्च करणे धोकादायक ठरू शकते. कारण सरकारी साइट्स अटॅकर्ससाठी प्रायमरी टार्गेट असतात आणि गुगलवर त्या सर्च केल्यानंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू शकता.

सोशल मीडिया साइट्स सर्च करणे टाळा
सोशल मीडिया साइटवर लॉग-इन करायचे असेल तर थेट साइटचा अड्रेस किंवा अ‍ॅपवर जा. गुगलवर सर्च करून सोशल साइटच्या पेजवर जाणे आणि लॉग-इन डिटेल्स टाकल्याने अटॅकर्स तुम्हाला जाळ्यात अडकवू शकतात. याद्वारे तुमचा यूजरनेम आणि पासवर्ड अटॅकरकडे पोहचू शकतो.