सरकारचा ‘कडक’ निर्णय ; आता आधारकार्डची ‘सक्ती’ केल्यास घडणार तुरुंगवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक खाते काढण्यासाठी आणि नवीन सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्डची गरज लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेतेखाली कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत ‘आधार आणि इतर कायदा विधेयक, २०१९’ला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक राष्ट्रपतींनी आधारविषयी काढलेल्या अध्यादेशाची जागा घेईल. २ मार्च २०१९ रोजी राष्ट्रपतींनी अध्यादेश काढला होता. या विधेयकाला संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनात सादर केले जाईल.

या विधेयकानुसार, कोणत्याही कंपनीकडून किंवा संस्थेकडून आधारकार्ड सक्तीने मागितल्यास १ कोटी रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. त्याचबरोबर, प्रत्येक दिवशी १० लाख रुपयापर्यंत अतिरिक्त दंड ठोठावला जावू शकतो. आधारचा गैरवापर केल्यास १०,००० रुपयाचा दंड आणि सोबत ३ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील केली जाऊ शकते.

संसदेकडून पारित होणाऱ्या या कायद्यानुसार, काही प्रकरणात स्वतःची ओळख दाखवण्यासाठी आधारकार्ड दाखवणे गरजेचे असेल. या कायद्यामुळे आधारकार्डचा गैरवापर करण्यावर प्रतिबंध लावता येतील.

सिने जगत –

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली…..

 

You might also like