आधारकार्ड डाउनलोड करताय… मग ‘ही’ काळजी अवश्य घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधारकार्ड न्यायालयाने सक्तीचे केले नसले तरी ते महत्वाच्या ओळखपत्रांविषयी एक आहे. सध्या कोणत्याही शासकीय कार्यालयात आधारकार्डचा वापर सक्तीचा झाला आहे. अनेकवेळा आधारकार्ड जवळ नसताना ऑनलाईन डाउनलोड केले जाते. तुम्ही कॉम्प्यूटरमधून ई आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आधार कार्ड देणाऱ्या अथाॅरिटी युनिक आयडेंटिफिकेशन अथाॅरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नं ई आधारकार्ड डाऊनलोड करणाऱ्यांना सावध केलं आहे. UIDAI ने याविषयी एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये UIDAI ने सूचना दिली आहे की, ‘तुम्ही एखाद्या सार्वजनिक कॉम्प्यूटरवरून आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. आधारला फक्त UIDAI च्या eaadhaar.uidiai.gov.in या ऑफिशियल वेबसाइटवरून डाऊनलोड करा. तसेच आपण आधारकार्ड डाउनलोड करण्यासाठी सार्वजनिक कॉम्प्यूटर वापरल्यास, आपण प्रिंट आउट काढल्यानंतर डाउनलोड केलेल्या फाईल हटविणे विसरू नका.’

ही काळजी घ्या –
आधारकार्डची प्रिंट काढल्यानंतर कम्प्युटरमधली आधारची काॅपी डिलिट करा. तुम्ही कॉम्प्यूटरमधून फाइल डिलिट केली तरी ती रिसायकल बिनमध्ये जाते. ती कायमची डिलिट करायची असेल तर रिसायकल बिनमध्ये जाऊन डिलिट करा. नाही तर रिसायकल बिनमधून पुन्हा फोल्डरमध्ये आणता येते. म्हणूनच ती संपूर्णपणे डिलिट करा. किंवा शिफ्ट प्लस डिलिट बटन दाबून ती फाईल कायमची डिलिट करा.