बँक खाते आणि मोबाईल SIMसाठी ‘आधार कार्ड’चा नवा ‘कायदा’, ‘गैरवापर’ केल्यास होईल मोठा ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या कॅबिनेटने आधारच्या नवीन विधेयकाला मंजुरी दिली आहे. कोणत्याही कंपनीकडून किंवा संस्थेकडून आधारकार्ड सक्तीने मागितल्यास १ कोटी रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. त्याचबरोबर, प्रत्येक दिवशी १० लाख रुपयापर्यंत अतिरिक्त दंड ठोठावला जावू शकतो. आधारचा गैरवापर केल्यास १०,००० रुपयाचा दंड आणि सोबत ३ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील केली जाऊ शकते.

बँक खाते उघडण्यासाठी आणि नवीन सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्डची गरज लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेतेखाली कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत ‘आधार आणि इतर कायदा विधेयक, २०१९’ मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक राष्ट्रपतींनी आधारविषयी काढलेल्या अध्यादेशाची जागा घेईल. २ मार्च २०१९ रोजी राष्ट्रपतींनी अध्यादेश काढला होता. या विधेयकाला संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनात सादर केले जाईल.

संसदेकडून पारित होणाऱ्या या कायद्यानुसार, काही प्रकरणात स्वतःची ओळख दाखवण्यासाठी आधारकार्ड दाखवणे गरजेचे असेल. या कायद्यामुळे आधारकार्डचा गैरवापर करण्यावर प्रतिबंध लावता येतील.

सिनेजगत

#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !