PM मोदींसाठी अमेरिकेतून येतंय नवे ’एअर इंडिया वन’ विमान, मिसाईल डिफेन्स सिस्टमने सज्ज, जाणून घ्या खासियत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नवे व्हीव्हीआयपी बोईंग विमान ’एअर इंडिया वन’ येत आहे. हे विमान पुढील आठवड्यात दिल्लीत येणार आहे. हे विमान खुपच हायटेक पद्धतीने डिझाईन केले आहे. सरकारने दोन रूंद बॉडी असणारी खास डिझाईन केलेली बोईंग 777-300 ईआर विमाने ऑर्डर केली आहेत. यापैकी एक विमान राष्ट्रपतींसाठी आणि दुसरे पंतप्रधान मोदींसाठी आहे.

रिपोर्टनुसार हे बोईंग ’एअर इंडिया वन’ विमान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचीसाठी वापरण्यात येणार्‍या ’एयरफोर्स वन’ विमानाच्या धरतीवर बनवण्यात आले आहे. ही दोन विमाने अमेरिकेत खासप्रकारे तयार केली जात आहेत. दोन्ही विमाने पुढील आठवड्यात दाखल होताच व्हीव्हीआयपी ताफ्यातील 25 वर्षे जुने बोईंग 747 विमान हटवण्यात येईल. ही दोन्ही विमाने भारतीय हवाईदलाचे पायलट चालवतील.

भारताकडून इंडियन एयरफोर्स, एअर इंडिया आणि भारत सरकारचे काही अधिकारी सुरक्षा कर्मचार्‍यांचे दल अमेरिकेत ’एअर इंडिया वन’ घेण्यासाठी रवाना झाले आहे.

जाणून घ्या मोदींच्या विमानाची खासियत

1 – ’एअर इंडिया वन’ विमान अ‍ॅडव्हान्स आणि सिक्युअर कम्युनिकेशन सिस्टमने सज्ज आहे.

2 – विमानातील ऑडियो-व्हिडियो संवाद टेप किंवा हॅक करता येणार नाही.

3 – हे विमान 8,458 कोटी रूपयात खरेदी केले आहे आणि दोन्ही विमानांचा बाहेरील भाग एखाद्या किल्ल्याप्रमाणे मजबूत आहे.

4 – ’एअर इंडिया वन’ विमानात आपली मिसाईल डिफेंस सिस्टम, सेल्फ प्रोटेक्शन सूट आहे.

5 – या विमानात कॉन्फरन्स रूम, व्हीव्हीआयपी प्रवाशांसाठी एक