मतदारसंघाचे महायुतीत नव्याने वाटप : पालकमंत्री प्रा. राम शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून अनेकदा निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ भाजपास सोडण्यात येऊ शकतो. तसेच मागील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढली. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन विधानसभा मतदारसंघाचे महायुतीत नव्याने वाटप होईल, असे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा.सुजय विखे, माजी खा.दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे,आ.शिवाजी कर्डीले, आ. बाळासाहेब मुरकुटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या नगर दौऱ्यात अनेक जण भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांची नावे आत्ताच जाहीर करणे योग्य ठरणार नाही. नगर जिल्ह्यात दि.२५ व २६ आँगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनदेश यात्रा येत आहे. दि.२५ला सकाळी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून लोणी येथे जाऊन ना.राधाकृष्ण विखे पा.यांंची सांत्वन भेट घेणा आहेत. यानंतर अकोल्यात दु.२ वा.रवाना होऊन तेथे महाजनदेश सभा होईल. ३ वा.संगमनेर येथे मालपाणी लाँनमध्ये सभा, राहुरी येथे सभा होऊन नगरला मार्गस्थ होणार आहे. सावेडी एम आय डिसी येथे भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्री यांचे स्वागत करणार आहेत.

शहरातून रँली काढण्यात येऊन यानंतर सांयकाळी ७ वा.गांधी मैदानात त्यांची सभा होईल. दि.२५ ला मुख्यमंत्री हे नगर विश्रामगहावर मुक्कामाला थांबणार आहेत. दि.२६ ला ते महाजनदेश यात्रा पाथर्डी कडे जाणार असून तेथे मार्केट यार्ड येथे ११.३० वा. सभा होईल. तत्पूर्वी भिंगार, करंजी, तिसगाव येथे स्वागत होणार आहे. माणिकदौंडी मार्गे आष्टीला सभेनंतर जामखेड सभा होणार आहे, यानंतर बीड येथे सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –