Coronavirus : भारतात आढळला कोरोनाचा नवा AP स्ट्रेन; 15 पटींनी जास्त संसर्गिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन भारतात आढळला आहे. AP स्ट्रेन असे त्याचे नाव आहे. हा स्ट्रेन आंध्र प्रदेशात सापडला आहे. हा 15 पटींनी संसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

वैज्ञानिक भाषेत या स्ट्रेनला N440K असेही म्हटले जाते. हा स्ट्रेन ‘सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी’ (CCMB) च्या वैज्ञानिकांनी शोधला आहे. हा स्ट्रेन इतका संसर्गिक आहे, की यामुळे 3-4 दिवसांतच लोक आजारी पडत आहेत. आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे हा स्ट्रेन पहिल्यांदा सापडला. हा वेरियंट B1.617 आणि B1.618 वेरियंटपेक्षाही जास्त घातक आहे. विशाखापट्टणचे जिल्हाधिकारी व्ही. विनयचंद यांनी सांगितले, CCMB येथे या वेरियंटची तपासणी केली जात आहे. हे खरे आहे, की कोरोनाचा नवा स्ट्रेन मिळाला आहे. याचे नुमने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. हा स्ट्रेन झपाट्याने पसरतो आणि लोकांना संक्रमित करतो. हा नवा स्ट्रेन आढळल्याने वैज्ञानिकही अडचणीत सापडले आहे. कारण त्यांना त्यावर जास्त काही सांगता येत नाही.

सध्या दक्षिण भारतात कोरोना व्हायरस वेरियंटचा फैलाव झाला आहे. यामध्ये B.1, B.1.1.7, B.1.351, B.1.617 आणि B.1.36* (N440K) चा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव B.1.617 चा झाला आहे. मात्र, आता AP स्ट्रेन म्हणजेच N440K वेरियंट पोहोचला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना व्हायरसच्या 6 स्ट्रेनचे संक्रमित आहेत. इथं B.1, B.1.1.7, B.1.351, B.1.36*(N440K), B.1.617 आणि B.1.618 वेरिएंट एपी स्ट्रेनचा प्रभावही आहे.

दक्षिण भारतासाठी चिंतेचा विषय

एपी स्ट्रेन हा दक्षिण भारतासाठी चिंताजनक विषय आहे. कारण या वेरियंटमुळे गेल्या सात दिवसांत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.